फार्मा उद्योगात ६ महिन्यांसाठी 'एस्मा' लागू; संपावर जाण्यास बंदी!

औषध निर्मिती आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारचे पाऊल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
फार्मा उद्योगात ६ महिन्यांसाठी 'एस्मा' लागू; संपावर जाण्यास बंदी!

पणजी: गोवा सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवा आणि औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील फार्मा उद्योगाशी (Pharmaceutical Sector) संबंधित कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी अत्यावश्यक सेवा परिरक्षण कायदा ('एस्मा' - ESMA) लागू करण्यात आला आहे. या आदेशाची कार्यवाही १७ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.

संपावर पूर्ण बंदी

सरकारने हा निर्णय राज्याच्या औषध उत्पादन आणि पुरवठा क्षेत्राचे अखंड कामकाज सुनिश्चित करण्यासाठी घेतला आहे. एस्मा लागू झाल्यामुळे, राज्यातील औषध निर्मिती, पॅकेजिंग, वितरण आणि वाहतूक युनिट्समधील कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास, काम थांबवण्यास किंवा ऑपरेशन्समध्ये अडथळा आणणाऱ्या कोणत्याही कृतीत सहभागी होण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे सार्वजनिक आरोग्य आणि अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही याची खात्री करणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. या संदर्भात पुढील काळात सरकारकडून अधिक मार्गदर्शक तत्त्वे आणि अनुपालन सूचना जारी केली जाईल. .

हेही वाचा