२३ जणांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन

पणजी : बर्च बाय रोमिओ लेन या क्लबमध्ये लागलेल्या भयंकर आगीत प्राण गमावलेल्या २५ जणांपैकी १७ जणांच्या कुटुंबीयांना गोवा सरकारने एकूण ८५ लाखांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. प्रत्येक मृतकाच्या परिवाराला ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती. तर, आठ जणांची आर्थिक मदत मंजूर होणार आहे.
शविचिकित्सा झाल्यावर मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे, त्याप्रमाणे निधीला मान्यता मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत गोवा सरकारने जाहीर केली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातर्फे २ लाखांची मदत जाहीर केली आहे.
५ लाखाची मदत जाहीर झालेल्या मृतांची नावे : मोहित मुंडा (१८, झारखंड), प्रदीप महतो (२२, झारखंड), बिनोद महतो (झारखंड),
राहूल तांटी (६०, आसाम), सतीश राणा (२६, उत्तराखंड), मनोजीत माल (२४, आसाम), सुरेंद्र सिंग (३८, सिमाली बाजरा), जीतेंद्र सिंग (२१, उत्तराखंड),
सुमीत नेगी (२९, उत्तराखंड), सरोज जोशी (४२, दिल्ली), मनिशसिंग महार (२२, उत्तराखंड), दिगंबर पतीर (३०, आसाम), विनोदकुमार धर (४०, दिल्ली)
अनिता जोशी (४३, दिल्ली), कमला चंद्र (४५, दिल्ली)मोहम्मद इसाक हुसेन (२५, कर्नाटक), डॉमनिक डिसोझा (४९, मुंबई).
शवचिकित्सा प्रक्रिया पूर्ण होताच मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येत आहेत. आतापर्यंत २५ पैकी २३ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव यतींद्र मराळकर यांनी दिली.
झारखंडमधील काही मृतांचे अंतिम संस्कार तेथेच करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.