गोवा। ‘अमेझिंग गोवा’मुळे अनेक उद्याेजक होतील तयार!

उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो; तीन दिवसीय समीटचा समारोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th November, 11:52 pm
गोवा। ‘अमेझिंग गोवा’मुळे अनेक उद्याेजक होतील तयार!

पणजी : व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनतर्फे आयोजित तीन दिवसीय ‘अमेझिंग गोवा बिझनेस समीट २०२४’चा केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील नव उद्योजकांना मोठा फायदा मिळाला आहे. भविष्यातील उद्योग उभारणीत या समीटचे महत्त्वपूर्ण योगदान राहील, असे प्रति​पादन उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केले.


समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन कुंकळ्येकर, उद्योजक राजकुमार कामत, जगत शहा आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात आयोजित ‘अमेझिंग गोवा बिझनेस समीट २०२४’मध्ये ५१ देशांनी सहभाग घेतला होता. या देशातील उद्योजकांनी अभिनव प्रयोग या समीटमध्ये सादर केले. विविध देशांतील उद्योजक यात सहभागी झाल्यामुळे उद्योग उभारणीसंदर्भातील विचारांचे एकमेकांत आदान-प्रदान झाले असून, त्याचा फायदा सर्वांनाच मिळेल, असा विश्वास मंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केला. ‘अमेझिंग गोवा बिझनेस समीट २०२४’ नवउद्योजकांसाठी मोठी संधी होती. उद्योग क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांनी या संधीचा लाभ घेतला असून, त्यांना त्याचा फायदा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा