गोवा। पोलिसाला मारहाण करणारा पोलीस आडपईकर बडतर्फ !

परशुराम सत्पालकरलाही घरचा रस्ता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th November, 12:05 am
गोवा। पोलिसाला मारहाण करणारा पोलीस आडपईकर बडतर्फ !

पणजी : बाणस्तारी पुलावर सेवा बजावणाऱ्या सहाय्यक उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी निलंबित असलेला रजत आडपईकर आणि बनावट दस्तावेज सादर केल्याप्रकरणी परशुराम सत्पालकर या दोन्ही पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. दक्षिण गोवा अधीक्षक सुनीता सावंत यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.             बाणस्तारी पुलावर सेवेवर असलेले वाहतूक विभागाचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक विवेक फडते यांना पोलीस खात्यातच कार्यरत असलेल्या संशयित रजत आडपईकर याने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. त्यानंतर त्याने स्वत:ला इजा पोहोचवत फडते यानेच आपल्याला प्रथम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. 

या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यानंतर रजत आडपईकर याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यासह या प्रकरणात बनावट दस्तावेज सादर केल्याप्रकरणी परशुराम सत्पालकर या पोलिसालाही सेवेतून बडतर्फ करण्यात आले.