पणजी : राज्यात होणाऱ्या ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा मायकल ग्रेसी दिग्दर्शित ‘दी बेटर मॅन’ या ऑस्ट्रेलियन चित्रपटाने उघडणार आहे. यंदा मानाचा सत्यजीत रे जीवन गौरवपुरस्कार ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉईस यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
यावेळी प्रसून जोशी, वृंदा देसाई, शेखर कपूर व अन्य मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या इफ्फीसाठी १०१ देशातून १६७६ चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या.
मास्टरक्लासमध्ये ए.आर. रेहमान, मणीरत्नम
यंदाच्या इफ्फीच्या मास्टरक्लास तसेच पॅनल डिस्कशनमध्ये ए.आर. रहमान, मणीरत्नम, शबाना आझमी, विधू विनोद चोप्रा, फिलिप नॉईस आणि जॉन सिल यांचा समावेश असणार आहे. डीपी मध्ये पाच मल्टिप्लेक्समध्ये २७० हून अधिक चित्रपट दाखवण्यात येतील.