आंदोलकांना चर्चचे आवाहन
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सुभाष वेलिंंगकर यांंनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे केवळ ख्रिस्तीच नव्हे तर इतर धर्मातील लोकांंच्याही भावना दुखावल्या आहेत. राज्यापुढे पर्यावरणाच्या ऱ्हासासह इतर अनेक ज्वलंंत समस्या आहेत. या समस्यांंकडे दुर्लक्ष होता कामा नये. वेलिंंगकर यांंच्या वक्तव्याचा जनतेने शांंतता राखत निषेध नोंदवावा, असे आवाहन चर्चने केले आहे.
कौन्सिल फॉर सोशल जस्टीस अँड पीस (सीएसजेपी) संंस्थेचे कार्यकारी सचिव फादर सावियो फर्नांंडिस यांंनी याविषयी पत्रक जारी केले आहे. ते पत्रकात पुढे म्हणतात, सुभाष वेलिंंगकर यांंनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांंचा अवमान केला आहे, त्याबद्दल सरकारने कायद्यानुसार कारवाई करावी. राज्यातील धार्मिक सलोखा कायम राहावा यासाठी जनतेने शांंततापूर्ण मार्गाने निषेध करण्यास कोणतीच हरकत नाही. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनेक गोष्टी सध्या राज्यात घडत आहेत. याविरुद्ध गोमंंतकीय जनतेचा लढा सुरूच आहे. भविष्यासाठी गोवा सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आहे. या ज्वलंंत प्रश्नांंकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणून प्रत्येकाने शांंतता बाळगावी.