आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!

‘मानवत मर्डर्स’मधून आशुतोष गोवारीकर रुपेरी पडद्यावर परतले

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th October, 12:09 am
आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!


अनन्या पांडे अभिनीत नवीन थ्रिलर कन्ट्रोलसह सोनी लिव्हवरील रहस्यमय गुन्हेगारी ड्रमा मानवत मर्डर्सपर्यंत अनेक चित्रपट व वेबसिरीज या शुक्रवारी ओटीटीवर झळकणार आहेत. चित्रपटगृहात मात्र आठवड्यात खास चित्रपट दाखल झालेले दिसत नाहीत.


मानवत मर्डर्स (सोनी लिव्ह)
ओटीटी रिलिजमध्ये एक चित्तथरारक चित्रपट मानवत मर्डर्स एका पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते जो संपूर्ण गावाला हादरवून सोडणाऱ्या सात भीषण हत्यांचा समावेश असलेल्या एका गुंतागुंतीच्या प्रकरणाला सामोरे जातो. गुन्हे शाखेचे अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर आधारित या मिस्ट्री क्राईम थ्रिलरमध्ये आशुतोष गोवारीकर, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासह अनेक प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे.


कन्ट्रोल (नेटफ्लिक्स)
हा एक थ्रिलर चित्रपट आहे, जो नेला युवतीभोवती फिरतो. जी एआय प्रोग्रामला विनंती करते की तिचा जोडीदार, ज्याने तिची फसवणूक केली आहे, त्याला तिच्या आयुष्यातून पुसून टाकावे. मात्र नंतर तो रहस्यमयपणे गायब झाल्याने नेला संकटात सापडले. विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित या चित्रपटात अनन्या पांडे, विहान सामत आणि देविका वत्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


द ट्राइब (ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ)
ओटीटी रिलिजमध्ये रिॲलिटी ड्रामा द ट्राईबचा समावेश आहे, ज्यामध्ये हार्दिक झवेरी, अलना पांडे, अलाविया जाफेरी, आर्याना गांधी, सृष्टी पोरे आणि अल्फिया जाफरी प्रमुख भूमिकेत आहेत, पाच श्रीमंत आणि ग्लॅमरस व्यक्ती त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतात आणि लॉस एंजेलिसला जातात. नऊ भागांच्या या मालिकेची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता आणि अनीशा बेग यांनी केली आहे.


द सिग्नेचर (झी ५)
ओटीटी रिलिजमध्ये गजेंद्र अहिरे दिग्दर्शित, हा भावनिक चित्रपट अरविंद नावाच्या एका वृद्ध व्यक्तीची कथा सांगतो. ज्याच्या जीवनात उलथापालथ होते, जेव्हा त्याची पत्नी मधू कोमात जाते आणि तिला लाइफ-सपोर्टवर ठेवले जाते, तेव्हा त्याच्या संकटांचा डोंगर कोसळतो.या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, नीना कुलकर्णी, अन्नू कपूर आणि रणवीर शौरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


स्वॅग (थिएटर्स)
हा तेलुगु कॉमेडी चित्रपट, हसित गोली लिखित आणि दिग्दर्शित आहे. या चित्रपटात अभिनेता श्री विष्णू तिहेरी भूमिकेत आहे. कथानक वेळ प्रवास आणि पुनर्जन्म या थीमभोवती फिरते. सहाय्यक भूमिकांमध्ये, चित्रपटात रितू वर्मा, मीरा जस्मिन आणि दक्षा नगरकर आहेत.


इट्स वॉट्स इनसाईड (नेटफ्लिक्स)
नवीन ओटीटी रिलीझच्या यादीतील हा एक रोमांचक चित्रपट आहे, जो तुम्हाला तुमच्या सीटवर बांधून ठेवेल. हा आर-रेट केलेला चित्रपट मित्रांच्या एका गटाभोवती फिरतो जे बऱ्याच काळानंतर एकाच छताखाली एकत्र येतात. त्यांचे पुनर्मिलन एक दुःस्वप्न बनते जेव्हा एक रहस्यमय सूटकेस असलेला माणूस त्यांच्यात सामील होतो आणि गटाला फाडून टाकणाऱ्या खेळात त्यांना गुंतवतो.


अमर प्रेम की प्रेम कहानी (जियोसिनेमा)
नवीन ओटीटी प्रकाशनाच्या यादीमध्ये प्रेमाच्या हक्कासाठी लढताना असंख्य सामाजिक आणि कौटुंबिक आव्हानांना तोंड देणाऱ्या दोन पुरुषांच्या जीवनातील रोमँटिक चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटात सनी सिंग, आदित्य सील आणि प्रनूतन बहल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


कलर्स ऑफ लव्ह (झी५)
ओटीटी रिलिजमध्येकलर्स ऑफ लव्ह हा एक मनोरंजक चित्रपट आहे, जो अवी नावाच्या तरुण डॉक्टरच्या जीवनाच्या अवती भवती फिरतो. जो त्याच्या ब्रेकअपनंतर नैराश्याशी झुंजतो. आपल्या मुलाला मदत करण्यासाठी, अवीची आई जवळच्या मित्र आणि मानसशास्त्रज्ञाकडे जाते. नंतर अवीच्या आयुष्यात बदल घडवून येतात.

हेही वाचा