गिरी-म्हापसा : क्राईम ब्रांचची छापेमारी; ६.८ लाखांचे ड्रग्स जप्त, महिलेस अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th September, 11:40 am
गिरी-म्हापसा : क्राईम ब्रांचची छापेमारी; ६.८ लाखांचे ड्रग्स जप्त, महिलेस अटक

म्हापसा : राज्यात फोफावणाऱ्या ड्रग्स व्यवसायावर लगाम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळ्या मोहिमा राबवते. याच अनुषंगाने  गुन्हे शाखेने गिरी म्हापसा येथे ड्रग्स विरोधी मोहीम राबवत एका महिलेस अटक केली. 

मिळालेल्या माहितीनुसार; गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे काल १९ सप्टेंबर रोजी अग्निवाडा-गिरी येथील रमाकांत कवठणकर यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत छापा टाकला. तपासणी दरम्यान येथे असलेल्या आशा अजय लाक्रा (४०, मूळ छत्तीसगढ) या महिलेच्या पर्समधून पोलीस अधिकाऱ्यांनी एमडीएमए आणि एक्टसीच्या तब्बल २६८ गोळ्या जप्त केल्या.  या गोळ्यांचे वजन ११८.५३७ ग्राम आहे, आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार या अमलीपदार्थाची किंमत ६.८ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. 

याप्रकरणी, अमलीपदार्थ विरोधी कायद्यांतर्गत येणाऱ्या कलमान्वये आशा लाक्रावर गुन्हा नोंदवून रीतसर अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक (गुन्हे शाखा) राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्षी अमोणकर आणि त्यांचे पथक पुढील तपास करत आहेत.  


हेही वाचा