पणजी : जुन्या मांडवीपुलावर तीन वाहनांत अपघात; ओव्हरटेकींग भोवले, महिलेसह तिघे गंभीर

खोळंबलेली वाहतूक नवीन पूलावरून वळवली. पर्वरी आणि पणजी बसस्थानकाजवळ वाहतूक कोंडी.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th September, 11:06 am
पणजी : जुन्या मांडवीपुलावर तीन वाहनांत अपघात; ओव्हरटेकींग भोवले, महिलेसह तिघे गंभीर

पणजी : रस्ते अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांत बेजबाबदारपणे वाहन चालवून लोकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या वाहनचालकांचा क्रम अग्रणी आहे. याचाच प्रत्यय आज सकाळी ९:१५ दरम्यान जुन्या मांडवी पुलावर आला. पणजीहून पर्वरीच्या दिशेने जाणाऱ्या मारुती सुझुकी बोलेनोच्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना ठोकरले. या भीषण अपघातात दुचाकीस्वार महिलेसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, पर्वरी व पणजी बसस्थानकाजवळ वाहतूक कोंडी झाली होती. या पूलावरील वाहतूक नवीन पुलावरुन वळवली असून 'पीक अवर्सध्ये' ही घटना घडल्याने कामानिमित प्रवास करणाऱ्यांत प्रचंड संताप निर्माण झाला होता. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. 


बातमी अपडेट होत आहे 


हेही वाचा