आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात?

‘युध्रा’ : सिद्धांत चतुर्वेदीचा ॲक्शन-पॅक अवतार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th September, 12:09 am
आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात?


या शुक्रवारी रोमांचक नवीन चित्रपट आणि मालिका ओटीटीवर झळकणार आहेत. यामध्ये ‘द पेंग्विन’, ‘व्हाट्स युअर इज माईन’, ‘ला मेसन’, ‘क्लास ९५: द पॉवर ऑफ ब्युटी’ आणि इतर चित्रपटआण मालिकांचा समावेश आहे. तर थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये ‘युध्रा’, ‘ट्रान्सफॉर्मर्स वन’सारखे चित्रपट आहेत.


ला मेसन (अॅपल टीव्ही+)
ला मेसन ही मालिका व्हिन्सेंट लेडॉक्स नावाच्या प्रसिद्ध डिझायनरभोवती फिरते (लॅम्बर्ट विल्सन). त्याचा एक वादग्रस्त व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर त्याचे फॅशन हाउस, मेसन चर्चेचा विषय बनले. त्याच्या निधनानंतर एक माजी मॉडेल ब्रँडची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि फॅशन जगतात त्याचे स्थान निर्माण करण्यासाठी एका दूरदर्शी डिझायनरसोबत काम करते.


युध्रा (थिएटर)
सिद्धांत चतुर्वेदी, मालविका मोहनन आणि राघव जुयाल अभिनीत, ॲक्शन-पॅक थ्रिलर चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे. चित्रपटाची कथा पिता पुत्राच्या ​जोडीची आहे जे शक्तिशाली ड्रग सिंडिकेटचा पाडाव करण्याच्या मोहिमेवर निघतात. ते त्यांच्या ध्येयामध्ये यशस्वी होतील का, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल.


क्लास ९५: द पॉवर ऑफ ब्युटी (नेटफ्लिक्स)
क्लास ९५: द पॉवर ऑफ ब्युटी ही एक उत्कंठावर्धक मालिका आहे, जी एका तरुण आणि महत्त्वाकांक्षी महिलेच्या जीवनावर आधारित आहे. जी स्वतःची मॉडेलिंग एजन्सी स्थापन करते. तिच्या आयुष्याला कलाटणी देण्याचे तिचे स्वप्न अनपेक्षित वळण घेते, जेव्हा एक माफिया फ्रंटमन तिचा भागीदार बनण्याचा प्रयत्न करतो.


द पेंग्विन (जिओसिनेमा)
द पेंग्विन मालिका रॉबर्ट पॅटिन्सनच्या द बॅटमॅन (२०२२) चित्रपटाचा स्पिन-ऑफ आहे. जी ओस्वाल्ड कोबलपॉटवर केंद्रित आहे, जो पेंग्विन म्हणून ओळखला जातो, जो कार्माइन फाल्कोनच्या मृत्यूनंतर गॉथमच्या गुन्हेगारी जगतात आपले स्थान मजबूत करण्यासाठी संधीचे सोने करतो. कॉलिन फॅरेल हे या मालिकेतील मुख्य पात्र आहे.


हिज थ्री डॉटर्स (नेटफ्लिक्स)
ओटीटी​ रि​लिमिध्ये एक हृदयस्पर्शी मा​लिका ‘हिज थ्री डॉटर्स’चा समावेश आहे. जी तीन बहिणींवर आधारीत आहे. ज्या न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या आजारी वडिलांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांचे एकमेकांशी नाते सुधारण्यासाठी पुन्हा एकत्र येतात.


डान्सिंग व्हिलेज: द कर्स बिगिन्स (थिएटर)
डान्सिंग व्हिलेज: द कर्स बिगिन्स हा सिंपलमनच्या केकेएन दि देसा पेनारी या कादंबरीवर आधारित इंडोनेशियन अलौकिक भयपट आहे. जो मिला नावाच्या एका महिलेची कथा सांगतो. जिच्या आत्म्याला सापाच्या राक्षसाने पकडले आहे. या चित्रपटाची उत्कट आणि मनोरंजक कथा तुम्हाला पडद्यावर खिळवून ठेवेल.


फर्स्ट लव्ह (लायन्सगेट प्ले)
ओटीटी रिलिजमध्ये रोमँटिक चित्रपट फर्स्ट लव्ह जिम आणि ॲन नावाच्या तरुण जोडप्याभोवती फिरतो, जे त्यांच्या वैयक्तिक आणि शैक्षणिक जीवनाचा समतोल साधताना त्यांच्या पहिल्या गंभीर नातेसंबंधातील चढ-उतारांमधून जातात. या चित्रपटात डायन क्रुगर, हिरो फिएनेस टिफिन आणि सिडनी पार्क यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


नेव्हर लेट गो (थिएटर)
हा सर्व्हायव्हल हॉरर थ्रिलर चित्रपट तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच तुम्हाला सीटवर ​खिळवून ठेवेल. हा चित्रपट एका आईभोवती फिरतो (हॅले बेरीने साकारलेली) आणि तिची जुळी मुले जी एका वेगळ्या घरात राहतात, जिथे एक वाईट आत्मा त्यांना पछाडतो. जेव्हा तिचा एक मुलगा त्या आत्म्याच्या तावडीत सापडतो. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीचा हे कुटंब कसा सामना करते, हे आपल्याला या चित्रपटात पहायला मिळेल.


जो तेरा है वो मेरा है (जिओसिनेमा)
ओटीटी रिलिजमधील चित्रपटांमध्ये विनोदी चित्रपट ‘जो तेरा है वो मेरा है’चा समावेश आहे. हा चित्रपट एका चहा विक्रेत्याभोवती फिरतो. राज त्रिवेदी दिग्दर्शित या चित्रपटात परेश रावल, अमित सियाल आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


ट्रान्सफॉर्मर्स वन (थिएटर)
ॲनिमेटेड चित्रपटप्रेमींसाठी हा एक चित्रपट पर्वणी आहे. या चित्रपटात ऑप्टिमस प्राइम आणि मेगाट्रॉनची मूळ कथा सांगण्यात आली आहे. ज्यांच्यामुळे त्यांच्या गृह ग्रहाचे भाग्य बदलले.

हेही वाचा