महाराष्ट्रातील अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, ६८ जण ताब्यात, पोलीस कर्मचारीही जखमी

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या वेळी दगडफेकीची घटना समोर आली आहे. अतिरिक्त फौजफाटा मागवून पोलिसांना लोकांना नियंत्रित करावे लागले. याप्रकरणी ६८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th September, 02:08 pm
महाराष्ट्रातील अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, ६८ जण ताब्यात, पोलीस कर्मचारीही जखमी

अकोला : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात आज गणपती विसर्जन मिरवणुकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंदीपेठ परिसरातील एका धार्मिक स्थळाजवळून जाणाऱ्या गणपती मिरवणुकीवर दुसऱ्या समाजाने ५ मिनिटे दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Stones hurled at Ganesh immersion procession in Akola district, 68 detained  – India TV

नंदीपेठ परिसरात दुपारी ४ वाजता ही घटना घडली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा मागवावा लागला. दगडफेकीच्या आरोपाखाली पोलिसांनी ६८ जणांना ताब्यात घेतले असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला आहे.

Stones hurled at Ganesh immersion procession in Akola district; 68 detained

या घटनेनंतर काही काळ मिरवणूक थांबवण्यात आली असून दोन्ही समाज आमनेसामने आल्याचेही वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अकोला पोलीस उपायुक्त अनमोल मित्तल यांनी सांगितले की, काही काळ दगडफेक झाली, मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून तणाव शांत केला आणि मिरवणूक पुन्हा सुरू केली. सध्या मिरवणूक शांततेत पार पडली असली तरी परिस्थिती पाहता परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ६८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.


Stones hurled at Ganesh immersion procession in Akola dist; 68 held

हेही वाचा