हिजबुल्लाविरोधात इस्रायलचा एल्गार; किलस्विच पेजर ठरला घातक हत्यार

लेबनॉनच्या बहुतांश भागांवर हिजबुल्लाचे नियंत्रण आहे. हॅकिंग आणि त्यानंतरच्या हल्ल्यांच्या भीतीने हिजबुल्लाने आपल्या सैनिकांना मोबाईल फोन वापरू नयेत असे सांगितले आहे. यासाठी येथील लोक पेजर वापरतात. लेबनॉनमध्ये झालेल्या सिरियल बॉम्बस्फोटात आतापर्यंत ११ ठार तर ४००० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th September, 10:08 am
हिजबुल्लाविरोधात इस्रायलचा एल्गार; किलस्विच पेजर ठरला घातक हत्यार

बैरुत : आज १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री लेबनॉनच्या अनेक शहरांमध्ये, लोकांच्या खिशात आणि हातात असलेल्या पेजरचा अचानक घरांत, रस्त्यावर आणि बाजारात स्फोट होऊ लागला. लेबनॉन ते सीरियापर्यंत हा प्रकार एक तासापर्यंत हा प्रकार सुरूच होता. आतापर्यंत यात  ११ जणांचा मृत्यू झाला असून ४००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, हिजबुल्ला या अतिरेकी संघटनेला लक्ष्य करण्यासाठी या घटनेला मुर्तस्वरूप देण्यात आले आहे.  इराणचे राजदूतही यात गंभीर जखमी झालेत. हे स्फोट इस्रायलने घडवून आणल्याचा आरोप हिजबुल्लाने केला आहे.

पेजर स्फोटात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र जागेअभावी त्यांच्यावर जमिनीवरच उपचार सुरू आहेत. - दैनिक भास्कर


लेबनॉनच्या बहुतांश भागांवर हिजबुल्लाचे नियंत्रण आहे. हॅकिंग आणि त्यानंतरच्या हल्ल्यांच्या भीतीने हिजबुल्लाने आपल्या सैनिकांना मोबाईल फोन वापरू नयेत असे सांगितले आहे. यासाठी येथील लोक पेजर वापरतात. हमास-हिजबुल्ला आणि मोसाद हे हाडवैरी आहेत. इस्रायली गुप्तहेर संघटना मोसादने आत्तापर्यंत अनेक कुख्यात अतिरेक्यांना यमसदनी पाठवले आहे. एका माहितीनुसार, १९६६ साली सॅटेलाइट फोनचा वापर करून अतिरेकी कारवायांना मूर्तस्वरूप देणाऱ्या अनेक अतिरेक्यांना मोसादने स्पेशल ऑपरेशन राबवून ठार केले. यातून धडा घेत गेली ५ दशके या भागात रेडिओ लहरींवर चालणाऱ्या पेजरचा वापर केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर हिजबुल्लाने पेजरचा वापर वाढवला होता. 

क्या होता पेजर जिनमें हुए धमाकों से दहला लेबनान, जानें- क्या इसे हैक करना  मुमकिन? - What is pager whose blast shook Lebanon can it be hacked ntc -  AajTak


पेजर स्फोट कसा झाला याविषयी दोन प्रकारचे सिद्धांत आहेत.

१) हॅकिंग:  पेजर हॅक केले असावेत अशी शक्यता आहे आणि त्यामध्ये असलेल्या लिथियम बॅटरी जास्त गरम झाल्या त्यांचा स्फोट झाला असावा. मात्र, ही शक्यता नगण्य आहे. 

२) सप्लाय चेन अटॅक: असा अंदाज वर्तवला जात आहे की पुरवठा किंवा उत्पादनादरम्यान पेजरमध्ये स्फोटके बसवली गेली असावीत, व  विशिष्ट किलस्विच संदेश मिळाल्यावरच विस्फोट करतात. डिसेंबरमध्ये नवीन पेजर्ससाठी ऑर्डर देण्यात आली होती व ऑगस्टमध्ये हिजबुल्लाला ते पुरवले गेले होते. उत्पादनादरम्यान पेजरमध्ये १० ते २० ग्रॅम उच्च दर्जाची लष्करी स्फोटके बसवण्यात आली असावीत.


Lebanon Pager Blast: क्या होता है Pager? मोसाद ने इसमें PETN डालकर इसे बम  कैसे बना

पेजर काय आहे आणि जगातील अतिरेकी संघटना याचा वापर का करतात ? 

पेजर हे एक वायरलेस उपकरण आहे व यास  बीपर असेही म्हणतात. १९५० मध्ये न्यूयॉर्क शहरात प्रथम पेजर्सचा वापर करण्यात आला. त्यानंतर ४० किलोमीटरच्या परिघात त्याद्वारे संदेश पाठवणे शक्य झाले. हे १९८० च्या दशकात जगभरात वापरले जाऊ लागले. २००० नंतर, वॉकी-टॉकी आणि मोबाईल फोनने त्याची जागा घेतली. पेजर्समध्ये सामान्यतः मर्यादित कीपॅडसह लहान स्क्रीन असतात. हे दोन प्रकारे संदेश पाठवण्यासाठी वापरले जाते - १ व्हॉइस संदेश २. अल्फान्यूमेरिक संदेश. लेबनॉनमध्ये स्फोट झालेले पेजर अल्फान्यूमेरिक असल्याचा दावा केला जात आहे.

11 killed, 4000 injured in pager blast in Lebanon | लेबनान में पेजर्स  ब्लास्ट में 11 की मौत, 3000 घायल: हिजबुल्लाह मेंबर्स को बनाया निशाना,  घायलों में ईरानी राजदूत भी ...


पेजर संदेश पाठवण्यासाठी रेडिओ लहरी वापरतात. हे बेस स्टेशनवर स्थापित ट्रान्समीटरद्वारे पाठवले जाते. प्रगत पेजर्सना फोन नंबर सारखे कोड नंबर दिले जातात. तो कोड डायल केल्यावर, संदेश फक्त त्या पेजरवर हस्तांतरित केले जातात. हे संप्रेषणाचे एक अतिशय सुरक्षित माध्यम आहे, व ते कोणत्याही सुरक्षा एजन्सीद्वारे सहजपणे शोधले जाऊ शकत नाही. पेजरना जीपीएस नाही किंवा त्याला आयपी ॲड्रेस नाही व यामुळेच तो मोबाईल फोनप्रमाणे ट्रेस करता येत नाही. पेजर नंबर बदलला जाऊ शकतो, यामुळे पेजर शोधणेदेखील सोपे नाही. पेजरचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर ते एका आठवड्यापेक्षा जास्त काळ वापरता येते. तर मोबाईल एक-दोन दिवसात चार्ज करावा लागतो. हेच कारण आहे की ते दुर्गम ठिकाणी वापरले जाते.

Serial explosions in pagers of Hezbollah members in Lebanon | लेबनान में  हिजबुल्लाह मेंबर्स के पेजर में सीरियल ब्लास्ट: 9 की मौत, 2700 से ज्यादा  घायल, इनमें ईरानी राजदूत ...

इस्त्रायलने हिजबुल्लाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी हे हल्ले केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिजबुल्लाचा आत्मविश्वास कमी होईल. हिजबुल्लाहवरील हा हल्ला पूर्वीपेक्षा खूपच वेगळा आहे.  लेबनॉनची अर्थव्यवस्था खूपच कमकुवत आहे. रुग्णालयांमध्ये साधनांची कमतरता आहे. अशा स्थितीत या हल्ल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये हिजबुल्लाविरुद्ध नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते.


लेबनान में हुए घातक पेजर विस्फोटों के बाद हिजबुल्लाह ने इजरायल के खिलाफ  जवाबी कार्रवाई की कसम खाई | रिपब्लिक वर्ल्ड

दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून शत्रूंचा नायनाट करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्ध पद्धतीचा अवलंब केला जात आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रू देशांच्या ड्रोन, जॅमर किंवा लढाऊ विमानांना चकवा देऊन त्यांना अडकवता येते.  रशिया-युक्रेन युद्धातही इलेक्ट्रॉनिक युद्धाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. २०२२ च्या उत्तरार्धात, युक्रेनने याच रणनीतीद्वारे एका ठिकाणी लपून बसलेल्या ४०० रशियन सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला होता. रशियन सैनिक मोबाइल फोन वापरत होते व या फोनचा आयपी ट्रॅक करत हा हल्ला केला होता. दरम्यान लेबनॉनमध्ये झालेल्या सिरियल बॉम्बस्फोटांद्वारे इस्रायलने हिजबुल्लाचे कंबरडे मोडले आहे. 

लेबनान में पेजर विस्फोट: वह कौन सा उपकरण है जिसके कारण 'सबसे बड़ी सुरक्षा  चूक' हुई - टाइम्स ऑफ इंडिया


 

हेही वाचा