यूपी-बिहार : मथुरामध्ये मालगाडी रुळावरून घसरली तर मुझफ्फरपूरमध्ये रेल्वेला अपघात

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मालगाडी रुळावरून घसरल्याने आग्रा-दिल्ली मार्गावरील २८ गाड्या इतरत्र वळवाव्या लागल्या. त्याचवेळी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे १६ गाड्या प्रभावित झाल्या आहेत. यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th September, 10:45 am
यूपी-बिहार : मथुरामध्ये मालगाडी रुळावरून घसरली तर मुझफ्फरपूरमध्ये रेल्वेला अपघात

मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा आणि बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये दोन मालगाड्या रुळावरून घसरल्या.बुधवारी रात्री झालेल्या या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रेल्वे वाहतूक मात्र प्रभावित झाली आहे. प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. आग्रा-दिल्ली मार्गावरील डझनहून अधिक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. तसेच बिहारमध्येही अनेक गाड्या थांबवाव्या लागल्या. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. 


मथुरा-मुजफ्फरपुर में 2 ट्रेनें डिरेल, यूपी-बिहार में हजारों यात्री परेशान -  two-good-trains-derailed-in-mathura-muzaffarpur-40-train -affected-passenger-troubled

उत्तर प्रदेशातील वृंदावन रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे २५ डबे रुळावरून घसरले आहेत. पाच डबे पूर्णपणे उलटले असून, ते रेल्वे रुळापासून वेगळे करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या रेल्वे अपघातामुळे दिल्ली आणि जयपूरला जाणाऱ्या २८ ट्रेन एक तर रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. दरम्यान बिहारमधील मुझफ्फरपूरच्या नारायणपूर स्टेशनजवळ बुधवारी संध्याकाळी भिलाईहून येणाऱ्या मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले .  या अपघातामुळे १३ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर ३ गाड्या रद्द करण्यात आल्या. अपघातानंतर देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू आहे.


Bihar Train Accident goods train 6 bogies derailed in Muzaffarpur know how  this accident happened | Bihar Train Accident: मुजफ्फरपुर में मालगाड़ी की 6  बोगियां पटरी से उतरीं, मुंगेर में हेड क्रेन

*मथुरा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने दिल्ली ते आग्रा इंटरसिटी आणि मेवाड एक्स्प्रेस छटा स्टेशनवर थांबवली आहे. तर कोसीकलन स्थानकावर तेलंगणा एक्सप्रेस, यूपी संपर्क क्रांती, केरळ एक्सप्रेस आणि कर्नाटक एक्सप्रेस या पलवल रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. हरिद्वार-वांद्रे एक्स्प्रेस फरीदाबाद स्टेशनवर थांबली. 


Rail accident: Four wagons of goods train derail in Bihar, services  disrupted | Video – India TV

*आग्राहून दिल्लीला जाणारी सोगरिया-नवी दिल्ली एक्स्प्रेस मुदेसी स्थानकावर, कोटा-उधमपूर एक्स्प्रेस जजमपट्टी स्थानकावर आणि नंदा देवी यांना बयाना रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. 

हेही वाचा