कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण: ममता बॅनर्जींनी पोलिस आयुक्त आणि दोन अधिकाऱ्यांना हटवले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th September, 11:06 am
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण:  ममता बॅनर्जींनी पोलिस आयुक्त आणि दोन अधिकाऱ्यांना हटवले

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील कनिष्ठ डॉक्टरांच्या निषेधानंतर, कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल आणि आरोग्य विभागाच्या दोन वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली तसेच आंदोलकांच्या तीन प्रमुख मागण्याही मान्य केल्या.  ममता बॅनर्जी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या निर्णयामुळे डॉक्टरांना किंचित दिलासा मिळाला आहे पण लढा अजूनही सुरूच आहे. 

डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी बाहेर येत डॉक्टरांच्या ९९ टक्के मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याचे  सांगितले. आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ९ ऑगस्ट रोजी झालेल्या ज्युनियर डॉक्टरची हत्या आणि बलात्कारानंतर या प्रकरणाने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आणि पुरावे लपवल्याचे आरोप केले होते. कोलकाता पोलिसांच्या उत्तर विभागाच्या प्रमुखावरही प्रश्न उपस्थित झाले होते, त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, शासनाचा आदेश निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.

ममता यांनी १०० कोटींच्या प्रकल्पाची घोषणा केली

बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे म्हटले आहे. आरोग्य विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची आता रिक्त पदांवर बदली होणार आहे. ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, डॉक्टरांचा वाढता अविश्वास पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा अद्याप संपलेला नसून आरोग्य सचिवांना हटवण्याची मागणी ते करत राहणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.


या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने आधीच डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते, मात्र पश्चिम बंगालच्या डॉक्टरांनी आंदोलन सुरूच ठेवले. या मुद्द्यावर देशभरातील डॉक्टरांनी एकजूट दाखवली. जनतेचा पाठिंबाही डॉक्टरांच्या पाठीशी राहिला, त्यामुळे या आंदोलनाला आणखी धार चढली 

हेही वाचा