आजच्या ताज्या घडामोडी : वन नेशन वन इलेक्शन; मिशन चांद्रयान-४ची तयारी व महत्त्वाच्या बातम्या

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th September, 09:51 am
आजच्या ताज्या घडामोडी : वन नेशन वन इलेक्शन; मिशन चांद्रयान-४ची तयारी व महत्त्वाच्या बातम्या

पणजी :  पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटने काल 'वन नेशन वन इलेक्शन'ला मंजूरी दिली. आता येत्या डिसेंबर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा होणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीने तब्बल ७ देशांच्या निवडणूक प्रक्रियांचा अभ्यास करून एक विस्तृत अहवाल बनवला होता. याच अहवालाच्या आधारे पुढील रोडमॅप तयार केला जाईल. 


सध्या देशात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुका. म्हणजेच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी मतदार एकाच दिवशी, एकाच वेळी किंवा टप्प्याटप्प्याने मतदान करतील.

१) मंत्रिमंडळाची चांद्रयान-४ मोहिमेला मंजुरी:  २०२८ मध्ये स्पेस स्टेशन आणि व्हीनस मिशन देखील लॉन्च केले जाईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाने चांद्रयान-४ मोहिमेला मंजुरी दिली आहे. चंद्रावर अंतराळयान उतरवणे आणि नमुने गोळा करणे आणि पृथ्वीवर परतणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. मंत्रिमंडळाने व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि इंडियन स्पेस स्टेशन (BAS) च्या स्थापनेलाही मंजुरी दिली आहे. २०२८ पर्यंत तिन्ही मोहिमा सुरू करण्याची योजना आहे.


-असा आहे रोडमॅप 

*चांद्रयान-४ मिशन: २१०४  कोटी रुपयांच्या या मिशनमध्ये चंद्राचे खडक आणि माती पृथ्वीवर आणली जाईल. या मोहिमेत दोन वेगवेगळ्या रॉकेटचा वापर केला जाणार आहे. दोन्ही वेगवेगळे पेलोड वाहून नेतील.

*व्हीनस ऑर्बिटर मिशन: १२३६ कोटी रुपयांचे हे मिशन मार्च २०२८मध्ये प्रक्षेपित केले जाईल. शुक्राचा पृष्ठभाग आणि वातावरण तसेच त्याच्या वातावरणावरील सूर्याचा प्रभाव समजून घेणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

*भारतीय अंतराळ स्थानक: गगनयान कार्यक्रमाची व्याप्ती वाढवत, भारतीय अंतराळ स्थानकाच्या (BAS-1) पहिल्या मॉड्यूलच्या विकासालाही मान्यता देण्यात आली आहे. सुधारित गगनयान कार्यक्रमात BAS-1 युनिटसह 8 मोहिमांचा समावेश आहे. ते डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करायचे आहे.

२) जम्मू-काश्मीर  निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ५८.८५ टक्के मतदान, किश्तवाडमध्ये सर्वाधिक ७७.२३ टक्के मतदान झाले. 

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७ जिल्ह्यांतील २४ विधानसभा जागांवर ५८.८५ मतदान झाले. निवडणूक आयोगानुसार, किश्तवाडमध्ये सर्वाधिक ७७.२३ टक्के आणि पुलवामामध्ये सर्वात कमी ४६.०३ टक्के मतदान झाले. दोडा ६९.३३ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी, रामबन ६७.७१टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर होते. महत्त्वाचे म्हणजे देशातील काश्मिरी पंडितांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी बूथ बनवण्यात आले होते. येथे देखील उत्तम प्रतिसाद लाभल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

Jammu & Kashmir Elections 2024: Phase 1 voting tomorrow; 219 candidates in  fray for 24 seats - Key contests - BusinessToday

३) मुलांसाठी एनपीएस वात्सल्य योजना सुरू, अर्थमंत्र्यांनी ऑनलाइन अर्ज पोर्टल सुरू केले

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी १८ वर्षाखालील मुलांसाठी एनपीएस वात्सल्य योजनेचे पोर्टल सुरू केले. २०२४ च्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली होती. एनपीएसमध्ये वात्सल्य मुले मोठी झाल्यावर आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत करेल. पालक त्यांच्या मुलांच्या वतीने या योजनेत गुंतवणूक करू शकतात. 

NPS Vatsalya Yojana Nirmala Sitharaman nps new pension scheme old pension  scheme what is nps vatsalya scheme - finance minister Nirmala Sitharaman  launch nps vatsalya yojana what is nps vatsalya scheme know

४)  आता लेबनॉनमध्ये वॉकी-टॉकी स्फोट, २० ठार

लेबनॉनमध्ये १७  सप्टेंबर रोजी पेजर बॉम्बस्फोटानंतर आता वॉकी-टॉकीमध्ये स्फोट झाले आहेत. यात २० जण ठार तर ४५० हून अधिक जखमी झाले. राजधानी बेरूतमधील अनेक भागात हे स्फोट झाले. लेबनॉनमधील हिजबुल्लाह लढवय्ये एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वॉकी-टॉकी वापरतात. यापूर्वी पेजरच्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता.  इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने हिजबुल्लाच्या ५००० पेजर्समध्ये स्फोटके पेरली होती. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह आज सायंकाळी साडेसात वाजता या स्फोटांना संबोधित करणार आहेत. एकूणच मध्यपूर्वेत शांतता नांदण्याची सुत्रांम शक्यता नाही. 


५)अतिशी २१  सप्टेंबर रोजी शपथ घेऊ शकतात: एलजीने केजरीवाल यांचा राजीनामा राष्ट्रपतींना पाठवला; अरविंद आठवडाभरात सोडणार सरकारी घर


६) भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये सुरू. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात कुलदीपच्या जागी आकाशदीपची एंट्री झाली आहे. 


७)  केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण, यूएईहून परतला होता: ९ सप्टेंबर रोजी, पश्चिम आफ्रिकन क्लेड २ मधील Mpox स्ट्रेनचा रुग्ण आढळला 

८) फोंड्यात अल्पवयीन विध्यार्थीनीचे अपहरण केल्याप्रकरणी सीताराम लक्ष्मीकांत गावकर (४०, मापा- पंचवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा नोंद. सदर घटना बुधवारी दुपारी घडली. अल्पवयीन विध्यार्थीनी व संशयीताचा शोध जारी. तर धुतळे- मडकई येथील मंदिरे धाकू गावडे (९०) या वृद्ध महिलेने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या. बुधवारी संध्याकाळी प्रकार आला उघडकीस.

हेही वाचा