लोन रिकव्हरी एजंटला पाहताच 'तिच्या' अंगात आली 'माता'; म्हणाली 'ट्रॅक्टर घेऊन कुठे जाता ?'

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
18th September, 12:20 pm
लोन रिकव्हरी एजंटला पाहताच 'तिच्या' अंगात आली 'माता'; म्हणाली 'ट्रॅक्टर घेऊन कुठे जाता ?'

बांसवाडा :  मध्यमवर्गीय लोक बऱ्याचदा 'ऋण काढून सण साजरे' करण्यास प्राधान्य देतात. क्रेडिट कार्ड लोन, गृह कर्ज आणि तत्सम कर्ज घेऊन आपल्या गरजा भागवतात. बऱ्याचदा हे कर्ज फेडणे या ना त्या कारणाने दुरापास्त होऊन जाते. अशावेळी बँका कर्जवसुलीसाठी तगादा लावतात. सामान्य लोकांची बदनामी देखील होते. आता राजस्थान येथील बांसवाडा येथे रिकव्हरी एजंट कर्ज वसुलीसाठी गेला असता त्याला येथील दृश्य पाहून धक्काच बसला. एजंटला पाहताच एका घरातील महिलेच्या अंगात माता संचारली. हे पाहून एजंटच्या पायाखालून जमीनच सरकली. 


Woman Pretends to be 'Possessed by Goddess' to Save Tractor from Loan Agent  | Watch Video - News18

रिकव्हरी एजंट या ठिकाणी कर्जाचे थकलेले हप्ते घेण्यासाठी आला होता. कुटुंबीय पैसे देण्यास असमर्थ असल्याने तो ट्रॅक्टर जप्त करण्यास निघाला. इतक्यात त्या कुटुंबातील एका महिलेच्या अंगात माता संचारली. तिने भारात येत एजंटला अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली व ट्रॅक्टर घेऊन जाण्यास मज्जाव केला. हे पाहून रिकव्हरी एजंटदेखील गडबडला व त्याला त्यांचे काम करू द्यावे अशी विनंती केली.  दरम्यान या महिलेने ट्रॅक्टर घेऊन गेल्यास गंभीर परिणाम भोगण्यास तयार राहण्यास सांगितले. या व्हिडिओ सोशल मिडियावर भलताच व्हायरल झाला असून आतापर्यंत तब्बल ४०  लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यावर अनेकांनी मजेशीर कमेन्ट देखील केल्या आहेत. 

दरम्यान गेल्या काळात याप्रकारची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. घेतलेले कर्ज फेडू न शकल्याने अनेकजण वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावताना दिसतात. बऱ्याचदा लोन रिकव्हरी एजंटना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची भीती दाखवली जाते. मात्र या व्हिडिओने नेटीझन्सचे बाळतेच मनोरंजन केले आहे. 

Debt Recovery Agent Training Institute | Certificate Course

हेही वाचा