कुल्लू हिमाचल येथे गोवा संघाला राष्ट्रीय उपविजेतेपद

तुषार नाईक सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर वृषभ गावडे मालिकावीर

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
18th September, 11:15 pm
कुल्लू हिमाचल येथे गोवा संघाला राष्ट्रीय उपविजेतेपद

डिचोली : ज्यूनियर राष्ट्रीय टी १० टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन इंडिया आयोजित अखिल भारतीय टी १० ही १९ वर्षा खालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा हिमाचल प्रदेशातील दशहरा कुल्लू येथे पार पडली. या स्पर्धेत गोवा संघ उपविजेता ठरला. गोवा संघाला अंतिम सामन्यात बिहार संघाकडून पराभव पत्करावा लागला. एकूण गोवा संघाची कामगिरी अतिशय सरस ठरली.
या स्पर्धेत मुलांचे १९ संघ तर मुलींचे ११ संघ या स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेत तुषार नाईक याला स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर वृषभ गावडे याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संघाला प्रशिक्षक चंदन डोंगरीकर व रामदास वरक तसेच व्यवस्थापक प्रणय गावकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच टी १० टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन गोवाचे अध्यक्ष दयेश वेंगुर्लेकर यांनी मुलांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.र.