राज्य बॅडमिंटन मानांकन स्पर्धेत राहुल देसवालला दुहेरी अजिंक्यपद

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th September, 10:49 pm
राज्य बॅडमिंटन मानांकन स्पर्धेत राहुल देसवालला दुहेरी अजिंक्यपद

पणजी : राहुल देसवालने जबरदस्त कामगिरी करताना बीपीएस राज्य बॅडमिंटन मानांकन स्पर्धेत पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेचे आयोजन मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम नावेली येथे करण्यात आले होते.

स्पर्धेचे आयोजन बीपीएस स्पोर्ट्स क्लबने गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने केले होते. ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची असून आगामी वरिष्ठ व राष्ट्रीय वेटरन्स स्पर्धेची निवड चाचणी म्हणून पाहिली जात आहे.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत राहुलने निशांत शेणईचे आव्हान २१-१८, १८-२१, २१-११ असे मोडून काढले. मिश्र दुहेरीत त्याने मलायका लोबोसह सूरज लामा आणि मिनोष्का परेरा जोडीचा २१-१८, २१-१० असा पराभव केला.

महिला एकेरीत आरोही कवठणकरने सुफिया शेखवर २१-१७, २१-९ असा विजय मिळवला, तर शिवांजली थिटे आणि सुफिया शेख यांनी महिला दुहेरीत आरोही कवठणकर आणि मिनोष्का परेरा यांचा २१-१८, २१-२१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. पुरुष दुहेरीत आर्यमन सराफ आणि सूरज लामा यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत फ्लॉइड आराउजो आणि फ्रेडरिक फर्नांडिस यांचा २१-१०, २१-११ असा पराभव केला.

वेटरन्स रँकिंग प्रकारामध्ये डॉ. मंजू खांडेपारकर हिने तिहेरी किताब पटकावला तर नवनीत नस्नोडकर, विनीता आडपाईकर, एहरलिक अताईदे, कमलेश कांजी, प्रदोष सिलीमखान, तानाजी सावंत आणि प्रदीप धोंड यांनी दुहेरी विजेतेपद पटकावले.

अर्चना मेरी, आयुब सी के, डॉ. सतीश कुडचडकर, फिलिप बार्बोसा, गोविंद नावेलकर, जतिंदर सिंग, ज्युडी ब्रागांझा, ज्युलियाना कुलासो, कृष्णानंद वेर्णेकर, कृष्णप्रसाद नाईक, मंजिरी मोक्ताली, मिलाग्रीना मस्करेन्हास, रश्मी लोबो, रुपचंद्र हुमरसकर, संदीप कांजी, डॉ. संदीप फोवकर, सतीशचंद्र खांडेपारकर, सेबॅस्टियन फेराओ, समरवेल दा गामा, विल्सन सी डिसोझा यांनीही आपापल्या गटात विजेतपद पटकावले.

वेटरन्स श्रेणीतील इतर उपविजेते

अहमद शेख, अर्नाल्डो रॉड्रिग्ज, बोव्हेंटुरा फेराओ, दीपक साळसकर, गणेश पै वेर्णेकर, इसाबेल अँटोनियो फर्नांडिस, जयश्री फर्नांडिस, जेफ्री डिसोझा, काशिनाथ जल्मी, किशोर रघुबंस, लुआन आल्मेडा, महेश पावस्कर, मंजिरी मोक्ताली, ओझिता, प्रतीक महाजन, पीटर टेलीस, प्रवीण शेनॉय, राजन मॅथ्यू, रिती रॉड्रिग्ज, रोझलिन बुन्यान, साहिल भुतानी. शमसुदीन सी के, सुप्रिया पै कुचेलकर, विष्णू दत्त शर्मा, वोल्युसियानो दुर्रादाे आणि विल्फ्रेड जॅक.