इंडियन सुपर लीगचा ११ वा हंगाम आजपासून
कोलकाता : आयएसएल लीग विजेता मोहन बागान सुपर जायंट आणि आयएसएल कप विजेता मुंबई सिटी एफसी या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीने इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) २०२४-२५ हंगामाची शुक्रवारी सुरुवात होणार आहे. कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर (व्हीवायबीके) येथे संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना रंगणार आहे.
मरिनर्सनी २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये केरळ ब्लास्टर्स एफसीविरुद्धच्या सलामीच्या लढती जिंकल्या आहेत. तथापि, आयर्लंडर्संविरुद्धच्या त्यांच्या विक्रमात सुधारणा आवश्यक आहे. मोहन बागानने आतापर्यंत त्यांच्या १० सामन्यांमध्ये मुंबई सिटी एफसीविरुद्ध एकदाच विजय मिळवला आहे. गेल्या मोसमात एप्रिलमध्ये जेतेपदाच्या सामन्यातील असल्याने तो विजय महत्त्वाचा होता.
नवे मुख्य प्रशिक्षक जोस मोलिना यांच्या नेतृत्वाखाली मोहन बागान लीग जेतेपद राखण्यास उत्सुक आहेत. मोलिनाने २०१६ मध्ये एटीकेचे प्रशिक्षकपद होते आणि यंदाच्या हंगामाद्वारे फुटबॉल हाच श्वास असलेल्या शहरात त्याचे पुनरागमन आहे.
मोहन बागानमधील एका नवीन क्लबसह मी २०१६ नंतर आयएसएलमध्ये परत येण्यासाठी खूप उत्साहित आहे. हा सर्वोत्तम क्लबपैकी एक आहे आणि नेहमीच आयएसएल चॅम्पियनशिपसाठी लढत असतो. प्रशिक्षकपद मोठी जबाबदारी आहे. आम्ही कठोर परिश्रम करून स्पर्धा जिंकू, अशी मला आशा आहे. खेळाडू असल्यापासून लीगची पातळी सुधारली आहे. मी येथे पुन्हा येऊन आणि भारतीय फुटबॉलला वाढण्यास मदत करताना खरोखरच आनंदी आहे, असे मोलिना यांनी मीडिया डे दरम्यान आयएसएलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
जेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक : पेट्र क्रॅट्की
मोलिना यांचे काउंटरपार्ट पेट्र क्रॅट्की यांनी मुंबई सिटी एफसीचे मुख्य प्रशिक्षकपद भूषविलेल्या १९ आयएसएल सामन्यांमध्ये ६८.४२ असा सक्सेस रेट राखला आहे. हंगामाच्या मध्यावर प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतरही त्यांनी मुंबई सिटीला कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ते आणि त्यांची टीम आता जेतेपद राखण्यादृष्टीने पाउल टाकेल. आयएसएल कप जिंकणे हे नेहमीच एक वास्तववादी स्वप्न असते. आम्ही ट्रॉफी जिंकण्यासाठी फुटबॉल खेळत आहोत. अद्याप लीग सुरू झालेली नाही. परंतु अन्य कोणत्याही हंगामाप्रमाणे या मोसमासाठी आमच्याकडे चांगले खेळाडू आणि प्रभावी रणनिती आहे. प्रशिक्षक या नात्याने, मला आमची इच्छा आहे की आम्ही प्रत्येक गेममध्ये बेसिक्सवर भर देण्याचा प्रयत्न करू आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, क्रॅटकीने मीडिया डे दरम्यान आयएसएलला सांगितले.