अपघातानंतर जखमी युवतीला रुग्णालयात केले दाखल
मांद्रे : राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताच्या घटना वाढत असून बहुतांशी अपघात हे वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यानेच घडत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नुकताच मांद्रे येथे एक भीषण अपघात घडला असून ट्रक रिक्षा आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दोन मुली जागीच ठार, तर तिसरी मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे.या अपघातात सानिका सुभाष खर्बे (१९) आणि प्रियंका संदेश खर्बे (२९) यांचा मृत्यू झाला असून सिद्धी हनुमंत शेटकर ही युवती गंभीर जखमी झाली आहे. तिन्ही मुली दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाल्याचे समजतेय. अपघातानंतर जखमी युवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संबंधित ट्रक ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस घटनास्थळी पंचनामा करत आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी गर्दी केली असून हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
सविस्तर बातमी अपडेट करत आहोत...