बाणस्तारी : दुचाकी चालकाने केली ऑन ड्युटी वाहतूक पोलिसाला मारहाण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th September 2024, 04:07 pm
बाणस्तारी : दुचाकी चालकाने केली ऑन ड्युटी वाहतूक पोलिसाला मारहाण

बाणस्तारी : येथे ड्युटीवर असलेल्या  वाहतूक विभागाचे सहाय्यक उपनिरीक्षक विवेक फडते यांना दुचाकी चालकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

आपण आपल्या आईसोबत जात असताना सदर पोलीस अधिकाऱ्याने बाणस्तारी पूलानजीक मला थांबण्याचा इशारा केला. नंतर पुढे जात आपल्या गाडीच्या चावीला हात घालत गाडी बाजूला करण्यास सांगितले. यावेळी कोणत्याही कागदपत्रांची विचारणी न करता थेट आपल्या कानशिलात ठेऊन दिली, असे दुचाकीचालकाने सांगितले.   

यावेळी येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान याप्रकरणी म्हार्दोळ पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. 

बातमी अपडेट होत आहे  

हेही वाचा