बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून
मुंबई : टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये येत्या १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेमधील पहिला कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. कसोटीमध्य टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंचे कमबॅक झाले आहे. पहिल्या कसोटीसाठी १६ खेळाडूंची निवड झाली आहे. बांगलादेशविरूद्ध प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे.
बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि विराट कोहली यांची निवड होणार निश्चित मानली जात आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल सलामीला तर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. त्यामुळे चौथ्या स्थानी विराट कोहलीला खेळावे लागणार आहे. त्यानंतर केएल राहुल आणि सर्फराज खान यांच्यातील एकाला संधी मिळू शकते. सहाव्या क्रमांकावर रिषभ पंत याचे स्थान निश्चित मानले जात आहे. पंत अपघातानंतर पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळणार आहे.
या खेळाडूंनंतर रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन हे तिघेही ऑल राऊंडर खेळू शकतात. कारण हे तिघे मुख्य ऑल राऊंडर असल्याने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये टीम इंडियाला फायदा होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर होत असल्याने तीन स्पिनर खेळवले जाणार यात काही शंका नाही. त्यानंतर दोन जे गोलंदाज असतील ते जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे असू शकतात.
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट नव्या दमाच्या खेळाडूंना बाहेर बसवू शकतात. सर्फराज खान, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, आकाशदीप आणि यश दयाल यांना बाहेर बसावे लागणार आहे. दोन कसोटी सामन्यांमधील फक्त एकाच कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या सामन्यासाठी फार काही मोठे बदल न दिसण्याची शक्यता आहे.
भारताचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.