डायमंड लीग फायनल : नीरज चोप्रा अंतिम फेरीसाठी पात्र; ऑलिंपिक विजेता अर्शद नदीम बाहेर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th September, 12:34 pm
डायमंड लीग फायनल : नीरज चोप्रा अंतिम फेरीसाठी पात्र; ऑलिंपिक विजेता अर्शद नदीम बाहेर

ब्रुसेल्स : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने १३  आणि १४ सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. झुरिच डायमंड लीगनंतर नीरजने १४  गुणांसह चौथे स्थान पटकावले. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स २९ गुणांसह अव्वल, तर जर्मनीचा ज्युलियन वेबर २१  गुणांसह दुसऱ्या आणि चेक प्रजासत्ताकचा जॅकब वडलेज १६  गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ब्रुसेल्समध्ये आपले स्थान निश्चित केलेल्या अंतिम सहा खेळाडूंत मोल्दोव्हाचा अँड्रियन मार्डेरे (१३ गुण) आणि जपानचा रॉडरिक गेन्की डीन (१२ गुण) यांचा समावेश आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ९२.९७ मीटर भालाफेकत सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानचा अर्शद नदीम केवळ पाच गुण मिळवत स्पर्धेतून बाद झाला.

Another 16 Diamond Races to be decided in Brussels – IAAF Diamond League |  PRESS-RELEASES | World Athletics

नीरज चोप्रा कंबर आणि ओटीपोटाच्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. या मोसमात नीरजने डायमंड लीगच्या केवळ दोन आवृत्त्यांमध्ये भाग घेतला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, मे महिन्यात, त्याने दोहामध्ये ८८.८६ मीटर भालाफेक केली आणि जेकबनंतर दुसरा क्रमांक पटकावला. लुसानेमध्ये, नीरजने पुन्हा ८९.४९ मीटर फेक करून दुसरे स्थान पटकावले, हा त्याचा हंगामातील सर्वोत्तम प्रयत्न होता.

Lausanne Diamond League 2024: Neeraj Chopra registers season-best throw of  89.49m; finishes 2nd in men's javelin


पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि टोकियोमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजनने ८९ मीटरचा टप्पा अनेक वेळा ओलांडला आहे, मात्र त्याला एकदाही ९० मीटरपेक्षा जास्त अंतरावर भालाफेक करता आलेली नाही. पॅरिसमधील पात्रता फेरीत नीरजने ८९.३४ मीटर भालाफेक करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत नीरजची कामगिरी कमकुवत दिसत होती, पण त्याने ८९.४५ मीटर फेक करून दुसरे स्थान पटकावले. नीरजने २०२२ मध्ये झुरिचमध्ये पार पडलेल्या डायमंड लीग फायनलमध्ये अव्वल स्थायंन पटकावले होते. त्यानंतर त्याने २०२३ मध्ये यूजीनमध्ये दुसरे स्थान मिळविले. आता नीरज आणि त्याच्या ब्रुसेल्समधील कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.

Diamond League: Neeraj Chopra qualifies for season finale in Brussels