गुळे येथे अपघातात पाळोळेचा युवक गंभीर जखमी

धडकेत बेल्जर गोम्सच्या डोक्याला गंभीर जखम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th September 2024, 12:32 am
गुळे येथे अपघातात पाळोळेचा युवक गंभीर जखमी

काणकोण : बुधवारी रात्री ८ च्या दरम्यान गुळे येथे झालेल्या अपघातात पाळोळे काणकोण येथील १९ वर्षीय बेल्जर गोम्स हा युवक गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर काणकोण येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला मडगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी की, गोम्स या युवक मडगावहून कानकोणच्या दिशेने येत होता. दरम्यान गुळे येथे बाजारपेठेत एक नादुरुस्त गाडी पार्क करण्यात आली होती. त्या गाडीला गोम्स याची जोरदार धडक बसली.

या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून सध्या त्याच्यावर मडगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास काणकोण पोलीस स्थानकाचे हरीश राऊत देसाई करत आहेत.