बँक गैरव्यवहार; ईडीकडून भूखंंड, व्हिला जप्त

एकूण २.८६ कोटींची मालमत्ता ताब्यात


29th August, 11:33 pm
बँक गैरव्यवहार; ईडीकडून भूखंंड, व्हिला जप्त

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बँक गैरव्यवहार प्रकरणी अंंमलबजावणी संंचालनालयाने (ईडी) भूखंड व व्हिला मिळून २.८६ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. अंंमलबजावणी संंचालनालाच्या अधिकृत सूत्रांंकडून ही माहिती मिळाली.
भ्रष्टाचार विरोधी विभागाने (एसीबी) मे. क्राऊन मिनरल्स ट्रेडिंंग कॉर्पोरेशन व भागधारकांविरूद्ध गुन्हा नोंंदवून आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी ईडीने या कंंपनीचे भूखंंड व व्हिला जप्त केला आहे. धारबांंदोडा येथील २२ भूखंंड जप्त करण्यात आले आहेत. हे भूखंंड रियाज शेख याच्या नावावर होते. याशिवाय कुंंकळ्ळी येथील दोन भूखंंड व फातोर्डा येथील व्हिला जप्त करण्यात आला आहे.
क्राऊन मिनेरल्स ट्रेडिंंग कॉर्पोरेशनच्या संंचालकांंनी कॅनरा बँकेकडून ७ कोटींचे कर्ज खनिज मालाच्या व्यवसायासाठी घेतले होते. इतर बँकांकडे तारण असलेल्या मालमत्तेवरच हे कर्ज घेतले. कर्जाची रक्कम बनावट व्यवहारांंच्या आधारे संंचालकांंनी स्वत:साठी वापरली. या प्रकरणी एसीबीकडून गुन्हा नोंद झाला आहे. 

हेही वाचा