पाणी पुरवठा वगळून दिगंबरना पीडब्ल्यूडी तवडकरना क्रीडा, आदिवासी कल्याण

फळदेसाईंकडे डीडीडब्ल्यू; गृहनिर्माण हटवून सुदिनना पुरातत्त्व

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
27th August, 04:09 pm
पाणी पुरवठा वगळून दिगंबरना पीडब्ल्यूडी तवडकरना क्रीडा, आदिवासी कल्याण
🏛️
📋 शपथविधीनंतर लांबलेले खाते वाटप शेवटी पार पडले
पणजी : शपथविधीनंतर लांबलेले खाते वाटप शेवटी गणेश चतुर्थीचा मुहूर्तावर पार पडले. अपेक्षे प्रमाणे दिगंबर कामत यांना सार्वजनिक बांधकाम खाते, बंदर कप्तान ही महत्त्वाची खाती देतानाच वजन आणि माप खाते देण्यात आले आहे.
📰
गोवन वार्ताचा अंदाज बरोबर
खाते वाटपाबाबत 'गोवन वार्ता'ने २२ ऑगस्टच्या बुलेटीनमध्ये वृत्त दिले होते. मुख्यमंत्र्यांनी अन्य दोन मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केले आहेत.
👥
नवे मंत्री
गेल्या आठवड्यात शपथ
सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर काणकोणचे आमदार रमेश तवडकर आणि मडगावचे आमदार नेते दिगंबर कामत यांना गेल्या आठवड्यात गुरुवारी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. राजभवन येथे झालेल्या एका समारंभात राज्यपाल अशोक गजपती राजू यांनी त्यांना मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती.
🔄
खातेवाटपात बदल
आपल्याकडचे चिल्लर खाती आहेत असे विधान करणारे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांना पाणी पुरवठा खाते (डीडब्ल्यूडी) देण्यात आले आहे. त्यांच्याकडून अभिलेखागर आणि पुरातत्व खाते वजा केली आहेत. वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून गृहनिर्माण खाते काढून त्या बदल्यात त्यांना संग्रहालय आणि राजपत्र ही खाती दिली आहेत.
दिगंबर कामत
सार्वजनिक बांधकाम
बंदर कप्तान
वजन व माप
रमेश तवडकर
क्रीडा
आदिवासी कल्याण
कला व संस्कृती
सुभाष फळदेसाई
समाजकल्याण
पाणीपुरवठा
अभिलेखागर व पुरातत्व वजा केली 
सुदिन ढवळीकर
वीज
संग्रहालय
राजपत्र
गृहनिर्माण वजा केले 
उत्सुकतेचा कालावधी
शपथविधीनंतर आठवडाभर नव्या मंत्र्यांना कुठली खाती मिळतील त्याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हे खातेवाटप अखेर पार पडले.
#Goa #MinistryPortfolios #CabinetReshuffle #DigambarKamat #RameshTawadkar #SubhashFalDesai #SudinDhavalikar
हेही वाचा