नवीन आय ड्रॉपला भारतात मान्यता : १५ मिनिटांत सुधारणार जवळची दृष्टी
नवी दिल्ली: भारताच्या औषध नियामक एजन्सीने डोळ्यांच्या एका ड्रॉपला मान्यता दिली आहे, जी अनेकांना चष्म्यापासून मुक्ती देणार हे. मुंबईस्थित एंटोड फार्मास्युटिकल्सने प्रेस्बायोपियाच्या उपचारांसाठी प्रेसव्यू आय ड्रॉप विकसित केले आहे. जे जगभरातील १.०९ ते १.८० अब्ज लोकांची चष्म्यापासून कायमची सुटका करणार आहे.
प्रिस्बायोपिया नैसर्गिकरित्या वृद्धत्वासह उद्भवते, ज्यामुळे जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. हे सहसा ४० वर्षानंतर ही प्रक्रिया सुरू होते व वयाच्या ६० व्या वर्षी ते अधिक खालावते. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या विषय तज्ज्ञ समितीने उत्पादनाची शिफारस केल्यानंतर एन्टटोड फार्मास्युटिकल्सला भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल (डीसीजीआय) कडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. प्रेसव्यू हा भारतातील पहिला ड्रॉप असल्याचा दावा केला जात आहे. जो प्रीस्बायोपियाने ग्रस्त असलेल्या लोकांना चष्म्यापासून सुटका करण्यासाठीमदत करणार आहे.
एन्टटोड फार्मास्युटिकल्सचे सीईओ निखिल के. मसूरकर यांनी सांगितले, प्रेसव्यू (PressVu) हा ड्रॉप लाखो, कोट्यवधी लोकांना चांगली दृष्टी देऊन त्यांचे जीवन सुधारण्यास मदत करणार आहे. या अनोख्या फॉर्म्युलेशनसाठी आणि त्याच्या उत्पादन प्रक्रियेसाठी पेटंटसाठी अर्ज केला आहे. प्रोप्रायटरी फॉर्म्युला केवळ जवळची कमी झालेली दृष्टी कमी सुधारत नाही तर तर डोळ्यांना सुरक्षित ठेवण्याचा अतिरिक्त फायदा देखील प्रदान करतो.ड्रॉपच्या प्रत्येक थेंबांमध्ये प्रगत डायनॅमिक बफर तंत्रज्ञान आहे, जे त्यांना त्वरीत पीएचशी जुळवून घेऊन दीर्घकालीन परिणामकारकता आणि सुरक्षितता प्रदान करते. हे थेंब वर्षानुवर्षे वापरले जाऊ शकतात.
डॉ. धनंजय बखले म्हणाले, प्रेस्बायोपिया असलेल्या रूग्णांसाठी, हा ड्रॉप नेत्ररोगशास्त्रातील एक अलौकीक प्रयोग आहे, जो नजीकची कमी झालेली दृष्टी पूर्ववत करतो.
ऑक्टोबरपासून होणार बाजारात उपलब्ध
डॉ. आदित्य सेठी म्हणाले की प्रेसव्यू एक प्रगत पर्याय आहे. ज्यामुळे १५ मिनिटांत जवळची दृष्टी सुधारते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून, प्रिस्क्रिप्शनवर आधारित आय ड्रॉप्स ३५० रुपये किमतीत फार्मसीमध्ये उपलब्ध होणार आहे. हे औषध ४० ते ५५ वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये सौम्य ते मध्यम प्रिस्बायोपियाच्या उपचारांसाठी आहे.