सराईत गुन्हेगार संशयित गौरेश केरकरला पर्वरी पोलिसांकडून अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th August, 04:38 pm
सराईत गुन्हेगार संशयित गौरेश केरकरला पर्वरी पोलिसांकडून अटक

पणजी : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. चोरटे देवळांत देखील आता चोरी करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. दरम्यान पर्वरी पोलिसांनी तोरडा येथून पळून जाण्याच्या बेतात असलेल्या सराईत गुन्हेगार गौरेश केरकरच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर चोरी करणे, सोनसाखळी हिसकावणे सारखे गुन्हे नोंद आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, काल ९ ऑगस्ट रोजी पर्वरी पोलिसांना गौरेश तोरडा परिसरात लपल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान पोलिसांचे पथक सायंकाळी उशिरा या ठिकाणी पोहोचताच गौरीशने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. सध्या पुढील तपास सुरू आहे.

मागेच ७ जानेवारी रोजी पणजी येथील चर्च परिसरात तेलंगणातील पर्यटकांनी पार्क केलेल्या रेन्ट ए कॅब कारची काच फोडून २ लाख रुपये रोख रकमेसह ९ लाखांचा मुद्देमाल चोरल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पणजी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. या चोरीतही गौरेशचा सहभाग असल्याचे समोर आले होते. 


बातमी अपडेट होत आहे.. 




हेही वाचा