साओ पाउलो : ब्राझीलच्या साओ पाउलो भागात विन्हेडो येथे एक प्रवासी विमान कोसळले. या अपघातात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अग्निशमन दलानेही विन्हेदो शहरात विमान क्रॅश झाल्याची पुष्टी केली.
ब्राझीलच्या व्हॉईपास एअरलाइनने जारी केलेल्या एका निवेदनात, साओ पाउलोच्या ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे विमान क्रॅश झालयाची माहिती दिली. विमानात ५८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. मात्र अपघात नेमका कशामुळे झाला हे निवेदनात सांगण्यात आलेले नाही.
विमान अपघातामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.