मंदिरात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पेडणे पोलिसांनी लढवली नवी शक्कल

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
27th July, 03:55 pm
मंदिरात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पेडणे पोलिसांनी लढवली नवी शक्कल

पेडणे : पेडणे पोलिसांनी बोलावलेल्या पेडण्यातील सर्व देवस्थान समितीच्या सदस्यांच्या बैठकीत, मंदिरात होणाऱ्या चोऱ्या आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वांचा समावेश असलेला व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावर अपडेट आणि सूचना प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता पेडणे पोलिसांनी मंदिरातील चोरी रोखण्यासाठी आणि चांगल्या पेट्रोलिंग साठी त्यांच्या सूचना/प्रतिक्रियांसाठी मंदिर समिती सदस्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. पेडणे पोलिसांनी प्रत्येक मंदिरात उपअधीक्षकांच्या सूचनेनुसार रजिस्टर ठेवण्यात आले आहे. पेट्रोलिंग कर्मचारी मंदिरात जाऊन त्या रजिस्टरवर स्वाक्षरी करतील.

पेडण्याचे उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी समिती सदस्यांना विनंती करत, त्यांनी दररोज सकाळी रजिस्टर तपासावे आणि गस्त घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्यास ते व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून प्रकाशात आणावे असे सांगितले. जेणेकरुन कर्मचारी मंदिराला भेट देताहेत की नाही नाहीत, याची वरिष्ठांनाही जाणीव होईल. मंदिरातील गस्त केवळ चोरी रोखण्यातच मदत होणार नाही तर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यास मदत करेल आणि इतर अनिष्ट घटनांना देखील प्रतिबंध घालता येईल.

हेही वाचा