फोंडा: बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिरानजीक धावत्या स्कुटरला आग लागण्याची घटना आज गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. रस्त्यावर बंद पडलेल्या दुचाकीची दुरुस्ती करण्यासाठी ती घेऊन जाणारा मेकॅनिक सुखरूप बचावला.
समोर आलेल्या माहितीनुसार कुर्टी येथील एका गॅरेज मध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेली स्कुटर घेऊन मेकॅनिक अन्य एक दुचाकी दुरुस्त करण्यासाठी गावणे - बांदोडा भागात जात होता. पण महालक्ष्मी मंदिर जवळ पोहचतच स्कुटरला आग लागली. स्कुटर चालकाने आणि स्थानिक लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीने उग्र रूप धरण केल्यानंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचेपर्यंत स्कुटर पूर्णपणे जळून खाक झाली होती.