फोंडा : केरी खांडेपार येथे ट्रक व दुचाकीत अपघात; दुचाकी चालक जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th September 2024, 01:41 pm
फोंडा : केरी खांडेपार येथे ट्रक व दुचाकीत अपघात; दुचाकी चालक जखमी

फोंडा: केरी-खांडेपार येथे  गुरुवारी सकाळी रस्त्यावर वळण घेणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसून दीपराज दासू नाईक (३५, भामई- पाळी) हा चालक जखमी झाला. दिपराजला अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा केला आहे. 


समोर आलेल्या माहितीनुसार जीए - ०४- के- ७३६९ या  क्रमांकाची दुचाकी खांडेपार येथून फोंडा येथे जात होती. केरी येथे पोहचताच रस्त्यावर वळण घेणाऱ्या जीए -०५- टी - २६५३ या ट्रकला दुचाकीची धडक बसून दुचाकी चालक जखमी झाला. जखमी दिपराजला सर्वप्रथम १०८ रुग्णवाहिकेतुन उपजिल्हा इस्पितळात दाखल  करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले. फोंडा पोलीस स्थानकाचे हवालदार देविदास पर्येकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. 

हेही वाचा