रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात होणार कारवाई

रस्ता ओलांडणे सुरक्षित बनण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगची तपासणी; राज्य रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय


16 mins ago
रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात होणार कारवाई

पणजी :  रस्ते सुरक्षित (Road safety) करण्यासाठी रस्त्याiवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याबरोबर रस्त्यांची संयुक्तपणे पहाणी करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा मंडळाच्या (State Road safety council) बैठकीत झाला. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंगच्या (Zebra crossing) तपासणीसह कामाच्या वेळी बॅरीकेडिंगची कार्यवाही करण्यावरही चर्चा झाली.

वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली. दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रस्ते अधिकाधिक सुरक्षित बनण्यासाठी रस्त्याच्या बाजूच्या बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल. वाहनांचा आकडा वाढल्याने रस्ता ओलांडणे धोकादायक बनत आहे. यावर उपाय म्हणून झेब्रा क्रॉसिंगची पहाणी करून त्यांचे योग्यरित्या मार्किंग करण्यात येईल. तसेच रस्त्याची दुरूस्ती सुरू असल्यास कंत्राटदाराला बॅरीकेडिंग करणे सक्तीचे असेल. अतिक्रमणे, झेब्रा क्रॉसिंग, बॅरीकेडींगच्या कार्यवाहीसाठी संयुक्तपणे रस्त्यांची पहाणी करण्यावर भर असेल.

वाहतूक नियम उल्लंघनावर नजर ठेवून दंड आकारण्यासाठी ‘स्पीड डीटेक्शन’ यंत्रणा व कॅमेऱ्यांचा अवलंब केला जाणार आहे. बैठकीला वाहतूक, पोलीस व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा