
पैंगीण : जयंतीनगर, उत्तर कर्नाटक (Uttar Karnatak) येथील मेलारी निंगप्पा बेवावडर (२८ वर्षे) या युवकाचा गोव्यातील (Goa) काणकोण (Canacona) येथील मनोहर पर्रीकर बायपास महामार्गावर झालेल्या स्वयं अपघातात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने; ती रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. आणि हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी सुमारे १० मीटर फरफटत गेली. काणकोण पोलीस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांनी सांगितले की, यासंदर्भात १९४ बीएनएसएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.