
काणकोण : काणकोण (Canacona) येथे दोनशे रुपयांच्या बनावट नोटांचा (Two Hundred Rupees Note) व्यवहार होत आहे. काणकोणमधील काही व्यापारी बॅंकेत पैसे जमा करण्यास गेल्या वेळी दोनशेची बनावट नोट असल्याचे बँक अधिकाऱ्याने (Bank Officer) सांगितले. दोनशेच्या त्या बनावट नोटेच्या ऑटरमार्कच्या जागी गांधीजी व हिरव्या ओळीत आर.बी.आय लिहिलेले नाही. काणकोणात दोनशेच्या बनावट नोटा चलनात आल्या असून, व्यापाऱ्यांनी नोटा तपासून घेण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही; असे बँक अधिकाऱ्याने सांगितले.