पर्रा, वेर्ला काणका भागात विजेच्या लपंडावामुळे संताप

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th July, 12:07 am
पर्रा, वेर्ला काणका भागात विजेच्या लपंडावामुळे संताप

म्हापसा : पर्रा येथील वीज फिडरमध्ये गेल्या एक महिन्यापासून वारंवार बिघाड होत असल्यामुळे पर्रा व वेर्ला काणका भागातील लोकांना विजेच्या लंपडावाला सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा म्हणून येत्या काही दिवसांत भूमिगत वीज वाहिनीद्वारे या फिडरचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय वीज खात्याने घेतला आहे.
मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यामुळे झाडे कोसळून पर्रा वीज फिडरच्या वाहिन्या तुटणे तसेच जंपर व कंडक्टरर्स खराब होण्याचे प्रकार घडत आहेत. शिवाय शेतजमिनीतून जाणार्‍या वाहिन्यांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार जास्त घडत आहेत. दिवसातून पाच-सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ वीज पुरवठा या फिडरच्या कार्यक्षेत्रातील भागात खंडित होतो.
वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पर्रा, वेर्ला काणका गावातील नागरिक तसेच व्यवसायिक हैराण झाले आहेत.
दरम्यान, पर्रा फिडरचा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी येत्या काही दिवसांत भूमिगत वीज वाहिन्यांना जोडणी दिली जाईल. त्यानंतर वीज पुरवठ्यात सुधारणा होईल, अशी माहिती वीज अधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा