मुख्यमंत्री आज दिल्लीला

पक्षाची बैठक आज, नीती आयोगाची बैठक उद्या


27th July, 12:04 am
मुख्यमंत्री आज दिल्लीला

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या, तसेच नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवारी सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. भाजपशासित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांची बैठक शनिवारी, तर नीती आयोगाची बैठक रविवारी होणार आहे.
लवकरच काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्षातही मोठे बदल होणार आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाध्यक्ष नड्डा यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना दिल्लीला बोलावले आहे. पंतप्रधान मोदी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पक्षामध्येही राष्ट्रीय पातळीवरून अंतर्गत बदल होणार आहेत. त्याबाबत नड्डा सर्वच प्रदेशाध्यक्षांशी बोलणार आहेत.
दरम्यान, नीती आयोगाची महत्त्वाची बैठक रविवारी दिल्लीत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.