कुंभारजुवा प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिकेची बदली रद्द

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 12:26 am
कुंभारजुवा प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिकेची बदली रद्द

पणजी : कुंभारजुवा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला गावडे यांची बदली शिक्षण खात्याकडून रद्द करण्यात आली. शाळेच्या मुलांनी आपल्या पालकांसह पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमांद सावंत यांनी हस्तक्षेप करत मुख्याध्यापिका मंगला गावडे यांची बदली रद्द केली.

कुंभारजुवे येथील शासकीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला गावडे यांची अचानक झालेली बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी पणजी येथील आझाद मैदानावर विद्यार्थ्यांसह पालकांनी धरणे आंदोलन केले. मुख्याध्यापिकेच्या बदलीचे कारण स्पष्ट नाही मात्र त्यांच्या बदलीमागे स्थानिक आमदारांचा हात असावा असा पालकांचा संशय आहे.

या प्रकरणात माझा हात नाही : राजेश फळदेसाई

मुख्याध्यापिका मंगला गावडे यांच्या बदलीमागे आपला हात नसल्याचे स्पष्टीकरण स्थानिक आमदार राजेश फळदेसाई यांनी दिले. कुंभारजुवे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या बदलीशी माझा कोणताही संबंध नाही. शिक्षकांच्या बदल्यांचा निर्णय शिक्षणमंत्री आणि शिक्षण संचालनालय घेतात. 

हेही वाचा