सप्टेंबरच्या १५ दिवसांत फक्त १० इंच पाऊस

राज्यात आतापर्यंत सरासरी १६४ इंच पावसाची नोंद


16th September, 12:49 am
सप्टेंबरच्या १५ दिवसांत फक्त १० इंच पाऊस

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : यंदा पावसाचे प्रमाण अधित असले तरी सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण बरेच कमी नाेंदवले गेले आहे. पहिल्या १५ दिवसांत राज्यात सरासरी फक्त १० इंच पावसाची नोंद झाली आहे. गणेशचतुर्थीनंतर तरी पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उष्म्याचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत राज्यात १६४ इंच (४,१७४.५ मिमी) पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण सरासरीहून ४५.९ टक्के अधिक आहे.
जून आणि जुलै महिन्यात पावसाने राज्याला झोडपून काढले. ऑगस्टमध्येही पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्ये मात्र पावसाने गती कमी केली आहे. गणरायाच्या आगमनानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाने चांगली हजेरी लावली. १० सप्टेंबर रोजी ३१ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर मागील पाच दिवसांत १० मिमीहून अधिक पावसाची नोंद झालेली नाही. राज्यात ३ सप्टेंबर रोजी २ इंचाहून अधिक पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस ३ तारखेला झाला होता. मागील २४ तासांत सरासरी २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मागील २४ तासांत केपे येथे १० मिमी, मुरगावात ४.२ मिमी, दाबोळी ६.८ मिमी, काणकोण ४.१ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत वाळपईत सर्वाधिक २१३ इंच पाऊस झाला आहे.

हेही वाचा