वृक्ष तोडण्याच्या परवाना शुल्कात ६० टक्क्यांनी घट

एक झाड तोडण्यासाठी ४०० रुपये शुल्क

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 12:30 am
वृक्ष तोडण्याच्या परवाना शुल्कात ६० टक्क्यांनी घट

पणजी : राज्यात वृक्ष तोडण्याच्या परवाना शुल्कात ६० टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. याबाबत वन खात्याच्या अवर सचिव डॉ. पूजा मडकईकर यांनी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार एक झाड तोडण्यासाठी ४०० रुपये परवाना शुल्क भरावे लागेल. याआधी जानेवारी महिन्यात हे शुल्क एक हजार रुपये करण्यात आले होते.

झाड तोडण्याची परवानगी घेताना सुरक्षा अनामत म्हणून प्रति झाडासाठी एका व्यक्तीस ४०० रुपये तर अन्य प्रकरणात एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. याआधीही ही रक्कम एका व्यक्तीस एक हजार तर अन्य प्रकरणात ५ हजार रुपये इतकी होती. 

गोवा वृक्ष संवर्धन कायदा १९८४ च्या नियम ६ अ मध्ये सुधारणा करून नवीन अधिसूचना काढण्यात आली आहे.

हेही वाचा