हरमल येथे कोसळले आंब्याचे झाड; जीवितहानी नाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th July, 04:15 pm
हरमल येथे कोसळले आंब्याचे झाड; जीवितहानी नाही

हरमल: येथील बीच रोड बेकरीनजीक असलेल्या बंगल्याच्या बागायतीमधील आंब्याचे झाड मुळापासून उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली.झाडामुळे रस्ता दुचाकी वगळता अन्य वाहनासाठी बंद राहिला. दरम्यान जीवितहानी टळल्याने नागरिकांनी निःश्वास सोडला.  यावेळी पंच सुशांत गावडे, पंच सांतान फर्नांडिस ,समाज कार्यकर्ते राजेश माजी आदींनी दुचाकी जाण्यासाठी,झाडांच्या फांद्या हटवल्याने वाहतूक कोंडी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, साधारणपणें दुपारी २ च्या सुमारास आंब्याचे झाड उन्मळून पडले. सुदैवाने रस्त्यातून वर्दळ कमी होती.दरम्यान,या भागांतील रस्त्यानजीक अनेक धोकादायक झाडे व माड असून त्यांची स्थिती पाहता,कधीही अनर्थ घडू शकतो.त्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यानी तलाठ्यामार्फत अहवाल तयार करून घ्यावा व धोकदायक झाडे त्वरित हटवावित अशी मागणी पंच सांतान फर्नांडिस व सुशांत गावडे यांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात, खालचावाडा येथील पांडुरंग खवणेकर यांच्या घरानजीकचे झाड पडले व दुसऱ्या दिवशी त्यांच्या घराची भिंत कोसळून पडली होती.त्यांना आपत्कालीन नुकसानभरपाईची गरज असून,उपजिल्हाधिकारी व मामलेदार अधिकाऱ्यांनी आवश्यक सोपस्कार करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.


हेही वाचा