किनारी भागात आतापर्यंत ५४ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th July, 02:50 pm
किनारी भागात आतापर्यंत ५४ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण

मडगाव : बाणावली मतदारसंघात बहुतांशी किनार्‍यांवर भटक्या कुत्र्यांचा त्रास पर्यटकांना होत आहे. कुत्र्यांनी चावे घेण्याचे प्रकार वाढत असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी मागे बैठकही घेतली होती. मिशन रेबिज व जागतिक पशुवैद्यकीय सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत ५४ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आलेले आहे. BMC to seek help of local feeders to vaccinate 5000 stray dogs against  rabies - Hindustan Times

गेल्या काही महिन्यांत बाणावली, कोलवा, केळशी या किनारपट्टीवरील भागात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढलेला आहे. काहीजणांना कुत्रा चावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी पशुवैद्यकीय अधिकारी व इतर अधिकार्‍यांसह बैठक घेतली होती. तर केळशी, सुरावली सरपंचांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत या प्रकरणी कुत्र्यांसाठी शेल्टर होम उभारण्याची मागणी केलेली होती. त्यानुसार मिशन रेबिज व जागतिक पशुवैद्यकीय सेवा यांच्या सहकार्यातून बाणावली, कोलवा, माजोर्डा परिसरात भटक्या कुत्र्यांना पकडून त्याच्या निर्बिजीकरणाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे भविष्यात कुत्र्यांची संख्या कमी होईल.India is struggling to keep rabies outbreak under control

दक्षिण गोव्यातील समुद्र किनारी काहीजणांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याचा घटना घडल्या. सध्या शॅक्स बंद असल्याने कुत्र्यांना खाण्यास मिळत नाही, त्यामुळे या कालावधीत खाण्यास देत कुत्र्यांना पकडणे सोपे जाणार असल्याने हा कालावधी निवडलेला आहे. या भागात दीडशे ते दोनशे भटके कुत्रे असतील असा अंदाज असून आतापर्यंत ५४ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आलेले आहे.Mission Rabies // WVS


हेही वाचा