पॅरिस ऑलिम्पिकवर करोना महामारीचे सावट

ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडू सापडल्या करोना पॉझिटिव्ह

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
25th July, 12:20 am
पॅरिस ऑलिम्पिकवर करोना महामारीचे सावट

फ्रान्स : पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत, पण या खेळांवर करोनाचा धोका निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघातील दोन महिला खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. वॉटर पोलो खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना वेगळे (आइसोलेट) करण्यात आले आहे. दरम्यान, करोनामुळे २०२० टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आले होते. पॅरिस ऑलिम्पिक हे २६ जुलैपासून सुरू होणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ऑलिम्पिक संघाचे प्रमुख एना मेयर्स म्हणाल्या की, सहकारी खेळाडू मास्क घालतील आणि सामाजिक अंतराचे नियम पाळतील. त्यांच्या सर्व साथीदारांचीही चाचणी घेण्यात आली. खेळाडूमध्ये अनेक लक्षणे होती आणि चांगली गोष्ट म्हणजे आमच्याकडे स्वतःची चाचणी उपकरणे होती जेणेकरून कोरोनाचे लवकर निदान करण्यात आले.
ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक समितीने सांगितले की, त्याच्या जवळच्या संपर्कात असलेल्या दुसऱ्या ऑस्ट्रेलियन अॅथलीटची देखील कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, परंतु संघातील इतर कोणत्याही खेळाडूची कोविड चाचणी ही पाॅझिटिव्ह आलेली नाही. कोविड-पॉझिटिव्ह ऍथलीटने मंगळवारी दुपारी तिच्या सहकाऱ्यांसोबत सराव केला नाही, परंतु दुसरी खेळाडू सरावात सहभागी होण्यासाठी पूर्णपणे निरोगी होती. दोघींची नावे उघड करण्यात आली नाहीत.
यावेळी फ्रान्स सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, देशात कोविड प्रकरणांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्री फ्रेडरिक व्हॅलेटॉक्स म्हणाले की, कोणताही मोठा धोका नाही. २०२०, २०२१, ‍२०२२ मध्ये आपण या महामारीला ज्या प्रकारे ताेंड दिले, त्यापेक्षा हा धोका फारच कमी आहे.