वास्कोत मालवाहू रेल्वे घसरली, दुसऱ्या रुळावरुन वाहतूक सुरळीत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th July, 12:03 am
वास्कोत मालवाहू रेल्वे घसरली, दुसऱ्या रुळावरुन वाहतूक सुरळीत

मडगाव : वास्को येथील मार्केटनजीकच्या रुळावर मालवाहू गाडी रुळावरुन घसरण्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे वास्को - पाटना या एकाच गाडीला विलंब होणार असून कोकण रेल्वेच्या दुसऱ्या मार्गावरुन इतर गाड्या वेळेवर सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

वास्को येथे मार्केटनजीक तानिया हॉटेलनजीकच्या रेल्वे रुळावर मालवाहू गाडी आली असता तिची चाके रुळावरुन घसरली. तत्काळ गाडी थांबवण्यात आल्याने कोणताही मोठा अपघात घडला नाही. ही मालवाहू गाडी घसरल्यानंतर तिला पुन्हा सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. या अपघातानंतर कोकण रेल्वेच्या दुसऱ्या रेल्वे मार्गावरुन मुंबईवरुन येणाऱ्या गाड्यांचा प्रवास वेळेनुसार सुरू आहे. मात्र, वास्को ते पाटना या गाडीला विलंब होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे उपप्रबंधक तथा वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. 

हेही वाचा