मुलाकडून चोरी, वडिलांकडून पोलिसात तक्रार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September 2024, 10:48 pm
मुलाकडून चोरी, वडिलांकडून पोलिसात तक्रार

मडगाव : घरातून वेगळ्या राहत असलेल्या मुलाने घरात प्रवेश करत कपाटातील २ लाख ८० हजारांचे दागिने चोरी केले. याप्रकरणी अॅंथनी ट्राव्हासो यांनी कुंकळ्ळी पोलिसात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांकडून संशयित रायन ट्राव्हासो विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

फातर्पा येथील अॅंथनी ट्राव्हासो यांनी मुलगा रायन याच्याविरोधात कुंकळ्ळी पोलिसात गुन्हा नोंद केला. रायन हा दुसरीकडे राहण्यास गेलेला आहे. २० ऑगस्ट रोजी संशयित रायन याने फातर्पा येथील घरात घुसून कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचा नेकलेस, सोन्याच्या बांगड्या व अंगठी असा २ लाख ८० रुपयांचे दागिने चोरी केले. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी रायन विरोधात गुन्हा नोंद केला असून पोलीस उपनिरीक्षक किशोर वेळीप पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचा