पोलिसांवर दगडफेक व धक्काबुक्की
पणजी : पर्ये येथील श्री भूमिका देवस्थानचा कालोत्सव साजरा करण्यावरून महाजन व सेवेकरींमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गांवकर व राणे या दोन्ही समाजांना मंदिराच्या गर्भकुडीमध्ये प्रवेश करण्यापासून पोलिसांनी अडविले आहे.
दरम्यान दोन्ही समाजांना लोकांना मंदिराच्या गर्भकुडीमध्ये प्रवेश करण्यापासून अडवताना पोलिसांची पुरती दमछाक झाली. येथील महिलांची उपस्थिती लक्षात घेत, महिला पोलिसांनी पुढे येत त्यांना थोपवले. सध्या येथील परिस्थिती तणावग्रस्त आहे. गांवकर समाजाने सभागृहामध्ये ठिय्या मांडला असून, प्रशासनाने यावर तोडगा काढून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना देखील समोर आली आहे.