राज्यात कुठेही अपघातग्रस्त गुरे दिसल्यास 'या' नंबरवर तातडीने संपर्क करा!

'वाळपई गोसंवर्धन केंद्रा'तर्फे अपघातग्रस्त गुरांसाठी महत्त्वाचा उपक्रम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th January, 12:42 pm
राज्यात कुठेही अपघातग्रस्त गुरे दिसल्यास 'या' नंबरवर तातडीने संपर्क करा!

वाळपईः अनेक वेळा रस्त्यावरील अपघातांमध्ये गुरे जखमी होण्याच्या घटना घडत असून कित्येक गुरांचा जीव देखील गेलेला आहे. या परिस्थितीवर उपाय म्हणून वाळपई गोशाळा संवर्धन केंद्र यांच्यातर्फे जखमी गुरांच्या उपचारांसाठी खास 'उपचार मोबाईल वाहन व्यवस्था' करण्यात आली आहे. 

या वाहनातून जखमी गुरांना गोशाळेमध्ये नेण्यात येऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. या संदर्भात केंद्रातर्फे एक खास फोन नंबर देखील जारी करण्यात आला असून ८३०८५०४७५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्राचे प्रमुख हनुमंत परब यांनी केले आहे. 

सरकारच्या माध्यमातून सदर वाहन गोशाळा संवर्धन केंद्राला मिळाले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये आठ जखमी गुरांवर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना जखमी गुरे आढळल्यास त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा अशा विनंती केंद्रामार्फत करण्यात आली आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने उपचार-

गोसंवर्धन केंद्रामार्फत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्यावतीने जखमी गुरांवर उपचार करण्यात येत असून आतापर्यंत अनेक जखमी गुरे या केंद्रामध्ये उपचार घेत आहेत. अनेकांकडून सेवेप्रती या केद्राला आर्थिक मदत मिळत असून या दानामुळे अनेक गुरांचा जीव वाचला आहे. यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे अशा प्रकारची विनंती केलेली आहे.

हेही वाचा