बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या २५ जणांना तीन लाखांचा दंड

मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th July 2024, 11:55 pm
बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या २५ जणांना तीन लाखांचा दंड

पणजी : समुद्रात एलईडी दिव्यांचा वापर तसेच मासेमारी बंदीचे उल्लंघन करून समुद्रात मासेमारी करणाऱ्या २५ जणांवर कारवाई करून ३ लाख २ हजार १५५ रु. चा दंड ठोठावण्यात आला. २०२३ च्या तुलनेतमत्स्योद्योग खात्याने एलईडी दिवे वापरणाऱ्यांच्या दंडात वाढ केली आहे, अशी माहितीमत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी ​दिली.
मत्स्योद्योग कायद्याच्या उल्लंघनाबाबत मत्स्योद्योग मंत्र्यांना प्रश्न कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी प्रश्न विचारला होता. याबाबत माहिती देतानामंत्री हळर्णकर म्हणाले की २०२२ ते २०२३ पर्यंत एलईडीचा वापर करणाऱ्या मच्छिमारांना २ लाख ४४ हजार ९७५ रु. आणि मासेमारी बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना ५७ हजार १४० रु. दंड केला होता. २०२१ ते २०२३ पर्यंत एलईडी दिव्यांचा वापर करणाऱ्या १७ मच्छीमारांवर कारवाई करण्यात आली. २०२१ मध्ये ६ जणांवर कारवाई केली. बाणावली, मोबोर-केळशी,वार्का, चिचणी, गोवा वेल्हा आणि कोळवा येथील मच्छिमारांचा समावेश आहेआहे. मात्र खात्याने दंडाचा तपशील दिलेला नाही.
२०२२ मध्ये सातजणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये बाणावली, वास्को, कोळवा,पर्वरी, रत्नागिरी आणि बांबोळी येथील मच्छिमारांचा समावेश होता. त्यांना २० हजार दंड करण्यात आला.
२०२३ मध्ये पाच जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये आगाशी,पणजी, खारीवाडो आणि वास्को येथील मच्छीमारांचा समावेश होता. त्यांना २ लाख २४ हजार ९७५ रु. दंड ठोठावण्यात आला.मासेमारी बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर कारवाई करण्यात आली.
२०२१ मध्ये या बंदीचे उल्लंघन झाले नाही, असे मंत्र्यांनी सांगितले. तर २०२२ मध्ये उल्लंघन करणाऱ्या ७ जणांवर कारवाई करून ५६ हजार ६४० रुपये दंड आकारण्यात आला.२०२३ मध्ये, एकाचीच उल्लंघन केल्याची नोंद झाली. त्याला ५ हजार रु.चा दंड ठोठावण्यात आला. एलईडी मासेमारी आणि बंदीच्या काळातील मासेमारीमुळे माशांच्याउत्पन्नात घट होण्याची दोन मुख्य कारणे आहेत. पणमत्स्य उत्पादनात घट झाल्याबद्दल अभ्यास झाला आहे का?याचे नेमके कारण काय असे विचारले असता मंत्री म्हणाले, या प्रकाराचा कोणताही अभ्यास झालेला नाही.त्याचे कारण माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.परंतु माशांची पैदास वाढण्यासाठी तसेच मच्छीमारांच्या जीवनमानासाठी अनेक उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांंनी सांगितले. या कार्यक्रमांतर्गत गोव्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी करण्यास बंदी आहे. या काळात बुल ट्रॉलर्स, एलइडी लाइट्स, जनरेटर लावून आणि जनरेटरशिवाय यांत्रिक मासेमारीबोटी, मोटारीवर चालणारे ट्रॉलर, पर्ससीन आणि जाळ्यांच्या मासेमारीवर बंदी आहे.
जिलेटीनद्वारे मासेमारीवरही बंदी
गोवा सागरी मत्स्यपालन नियमन कायद्यांतर्गत मासेमारीसाठी २४ मिलिमीटर जाळीपेक्षा कमी आणि कोळंबी धरण्यासाठी २० मिलिमीटर जाळ्यांनामासेमारीचे परवाने दिले जातात. राज्यातील २० माशांच्या प्रजातींसाठीकिमान कायदेशीर आकाराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर कृत्रिम जेटी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.तसेच नदी व समुद्रात मासे जिलेटिन व इतर रसायनांच्या सहाय्याने पकडले जातात. त्यांवर बंदी घालण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे मंत्री हळर्णकर यांनी सांगितले.