पेडणेतील बेकायदा वाळू उपसा : सात जणांना अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
पेडणेतील बेकायदा वाळू उपसा : सात जणांना अटक

पणजी : बेकायदेशीर वाळू उपशातून पोरस्कडे, पेडणे (Pernem) येथे झालेल्या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर आता पोलिसांना (Police) जाग आली असून, पेडणे पोलिसांनी पोरस्कडे तसेच इतर ठिकाणी बेकायदेशीररित्या वाळू (Illegal sand extraction) उपसा केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे. 

पेडणेत तेरेखोल नदीतून (Terekhol River)  बेकायदेशीर वाळू उपसा करण्याचे सत्र सुरू आहे. त्यातूनच दोन दिवसांमागे वाळू उपसा करीत असलेल्या दोघा कामगारांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यात पोरस्कडे येथे वास्तव्यास असलेले व मूळ बिहार (Bihar) येथील कामगार गंभीर जखमी झाले होते. एकाच्या हातातून तर अन्य एकाच्या मानेतून गोळी आरपार झाली होती. त्यानंतर खळबळ माजली होती. त्यामुळे बेकायदा वाळू उपशाचा प्रश्न ही ऐरणीवर आला होता. त्यात पोलीस व प्रशासनाला लक्ष्य करण्यात येत होते. त्यानंतर आता पोलिसांनी बेकायदेशीररित्या करण्यात येत असलेल्या वाळू उपशासंदर्भात कडक पावले उचलली आहेत. विविध ठिकाणी धाडी टाकून सात जणांना अटक केली आहे

हेही वाचा