धेंपो बंगल्यावरील दरोडा : एकाला अटक

सात महिन्यांमागील प्रकरण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
धेंपो बंगल्यावरील दरोडा : एकाला अटक

पणजी : सात महिन्यांमागे दोनापावला येथे प्रसिद्ध उद्योगपतीच्या बंगल्यावर  घालण्यात आलेल्या सश‍स्त्र दरोडाप्रकरणी (Dona Paula Dacoity) पणजी पोलिसांनी (Goa Police) एकाला अटक केली आहे. याकूब महम्मद अली (४६ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.

२० एप्रिल, २०२५ रोजी दोनापावला येथील धेंपो व्हिस्ता (Dempo Vista) या बंगल्यावर दरोडा टाकण्यात आला होता. 

पोलिसांना तांत्रिक (Police) तपासणी करताना काही धागेदोरे हाती लागले. त्याआधारे पोलिसांनी ओळख पटवून याकूब अली याला अटक केली. त्याने बंगला दाखवण्यासाठी व दरोडा टाकण्यात सहकार्य केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

दरोडा टाकल्यानंतर याप्रकरणात गुंतलेल्यांना आश्रय दिल्याचे ही पुढे आले आहे. अटक करण्यात आलेल्या याकूब याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. वास्को पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनी हल्ला करणे व शस्त्रात्र कायद्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. 

त्यानंतर कोलवाळ तुरुंगात होता. २९ ऑक्टोबर रोजी त्याला अटक करण्यात आली होती. सध्या, ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पणजी पोलीस व गुन्हा शाखेच्या सहकार्याने त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


हेही वाचा